Kane Williamson has again become number one in the ICC Test batting rankings: हेडिंग्ले कसोटी सामना संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यानुसार टॉप-५ स्थानांमध्ये मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने आपल्याच संघातील अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे.

इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शानदार कामगिरी करत ट्रॅव्हिस हेडने दोन स्थानांनी झेप घेतली आहे. तो आता न्यूझीलंडचा अनुभवी केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर आहे. २९ वर्षीय खेळाडूने अॅशेसमध्ये ४४.३३च्या सरासरीने २६६ धावा केल्या आहे, तो इंग्लिश गोलंदाजांना सतत त्रास देत आहे. या क्रमवारीत पुन्हा एकदा केन विल्यमसन नंबर वनच्या खुर्चीवर विराजमान झाला आहे. गेल्या सुमारे चार महिन्यांपासून तो कसोटी खेळला नाही, पण त्यानंतरही गेल्या आठवड्यात त्याने पहिल्या क्रमांकाची खुर्ची काबीज केली होती, जी अजूनही अबाधित आहे. त्याचे ८८३ गुण आहेत.

KL Rahul Argues With Umpire in live match and Sledges Shivam Dube CSK vs LSG
IPL 2024: केएल राहुल लाइव्ह सामन्यात थेट पंचांवरच भडकला, दुबेलाही सुनावलं; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Shubman Gill Surpasses Virat Kohli and Sanju Samson in Unique Record
IPL 2024: शुबमन गिलने विराट-सॅमसनला मागे टाकत रचला इतिहास, आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

बाबर आझमचा फायदा, स्मिथचा तोटा –

फलंदाजांच्या यादीत हेडच्या वाटचालीमुळे फलंदाजी क्रमवारीत आणखी एक फेरबदल झाला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तीन स्थानांनी पुढे तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथ दोन स्थानांच्या नुकसानासह चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. याशिवाय मार्नस लबुशेन पाचव्या आणि जो रूट सहाव्या स्थानावर आला आहे.

हेही वाचा – DD vs NRK: TNPL 2023 मध्ये तीन खेळाडूंकडून एक झेल सुटल्याने चाहत्यांना आली पाकिस्तान संघाची आठवण, पाहा VIDEO

बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रूकलाही झाला फायदा –

लीड्समध्ये तीन गडी राखून विजय मिळविल्यानंतर इंग्लंडसाठी चांगली बातमी आहे. युवा खेळाडू हॅरी ब्रूकने दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावल्यानंतर कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट क्रमवारीसह १२व्या स्थानावर पोहोचला आहे त्याचबरोबर कर्णधार बेन स्टोक्स पाच स्थानांनी पुढे सरकत १८व्या स्थानावर पोहोचला आहे.

आयसीसी फलंदाजांची कसोटी क्रमवारी –

१. केन विल्यमसन: ८८३
२. ट्रॅव्हिस हेड: ८७४
३. बाबर आझम : ८६२
४. स्टीव्ह स्मिथ: ८५५
५. मार्नस लॅबुशेन: ८४९
६. जो रूट: ८४२
७. उस्मान ख्वाजा: ८२४
८. डॅरिल मिशेल: ७९२
९. दिमुथ करुणारत्ने: ७८०
१०. ऋषभ पंत: ७५८