scorecardresearch

Premium

Kane Williamson Steps Down: विल्यमसन कसोटी कर्णधारपदावरुन पायउतार; न्यूझीलंडचा नवा कर्णधार कोण हे ही ठरलं

न्यूझीलंडचा लवकरच संघ पाकिस्तान संघाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यापूर्वी केन विल्यमसनने आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे.

Kane Williamson has resigned as the captain of the New Zealand Test team and Tim Southee will be the new captain of the team
केन विल्यमसन (संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

केन विल्यमसनने न्यूझीलंड कसोटी संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे. न्यूझीलंड क्रिकेट (NZC) ने गुरुवारी सांगितले की, केन विल्यमसनने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथी क्रिकेटच्या सर्वात प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर टॉम लॅथम उपकर्णधार म्हणून संघाची धुरा सांभाळेल. केन विल्यमसन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करत राहणार आहे.

३२ वर्षीय केन विल्यमसनने एक निवेदन जारी करून सांगितले की, वर्कलोडचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाशी बोलून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. टीम साऊदी हा न्यूझीलंडचा ३१वा कसोटी कर्णधार असेल. सौदीच्या नेतृत्वाखाली, किवी संघ या महिन्याच्या शेवटी पाकिस्तानचा दौरा करेल, जिथे न्यूझीलंड संघ यजमान संघासोबत २ कसोटी आणि ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल. ही मालिका २६ डिसेंबर ते १३ जानेवारी २०२३ पर्यंत चालेल.

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली किवी संघाने २२ कसोटी सामने जिंकले –

हेही वाचा – ठरलं… Argentina vs France वर्ल्ड कप फायनल! मोरक्कोला २-० ने पराभूत करत फ्रान्सची Final मध्ये धडक

कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यानंतर केन विल्यमसनने ६ वर्षांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. २०१६ मध्ये, त्याच्याकडे ब्रेंडन मॅक्युलमनंतर कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. विल्यमसनने ३८ कसोटी सामन्यांमध्ये किवी संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान न्यूझीलंडने २२ कसोटी सामने जिंकले. विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने गेल्या वर्षी अंतिम फेरीत भारताचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ जिंकली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2022 at 08:29 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×