माजी क्रिकेटपटू आणि भारताला पहिला क्रिकेट वर्ल्डकप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. एका जाहिरातीत कपिल देव हे रणवीर सिंहच्या अवतारात दिसले. वेगवेगळ्या रंगाच्या कपडे परिधान करून मैदानात दिसले. क्रेड कंपनीने दसऱ्याच्या औचित्य साधत एक जाहिरात प्रदर्शित केली आहे. यात कपिल देव यांचा अनोखा अंदाज दिसला. या व्हिडिओत कपिल देव रंगबेरंगी कपड्यात क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. चमकणाऱ्या कपड्यात गोलंदाजी करत आहे. तर डबल चश्मा घालून पत्रकार परिषद घेत आहेत.
कपिल देव यांचा अनोखा अंदाज लोकांना चांगलाच भावला आहे. कपिल देव यांनी ही जाहिरात ट्वीट करताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.
१९८३ च्या वर्ल्डकपवर एका चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात रणवीर सिंह कपिल देव यांच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण हिचा छोटा रोल आहे. ती कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. तर पंकज त्रिपाठी, आर बद्री, एमी विर्क, साहिल खट्टर, निशांत दहिया, दिनकर शर्मा, चिराग पाटील, ताहिर राज भसीन यासारखे कलाकार काम करत आहेत. त्यामुळे ही जाहिरात खास आहे.