KBC 13 : हॉट सीटवर बसलेल्या ‘बिग बीं’वर गांगुलीच्या प्रश्नांचा भडीमार; बच्चन म्हणाले, ”दया करा…”

सोनी टीव्हीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक VIDEO शेअर केला आहे.

KBC 13 Amitabh Bachchan turned contestant as sourav ganguly took over hosting duties watch video
KBC 13 मध्ये सौरव गांगुलीनं घेतली अमिताभ बच्चन यांची जागा

‘कौन बनेगा करोडपती’च्या (केबीसी) १३ व्या सीझनसह अमिताभ बच्चन प्रेक्षकांमध्ये परतले आहेत. या आठवड्यात केबीसीचा सेलिब्रिटी एपिसोड शुक्रवारी सोनी टीव्हीवर प्रसारित होईल. यावेळी सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग शोमध्ये पाहुणे म्हणून येतील. याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहमी होस्टच्या सीटवर बसणारे अमिताभ बच्चन हॉट सीटवर बसलेले दिसणार आहेत, तर गांगुली त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करणार आहे.

सोनी टीव्हीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केबीसीच्या या सेलिब्रिटी एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे, सुरुवातीला गांगुली प्रेक्षकांना होस्ट म्हणून ओळख करून देतो आणि मग अमिताभ बच्चन यांना वीरेंद्र सेहवाग ही तुमची एकमेव लाईफलाइन आहे, असे सांगतो. यानंतर बिग बी सेहवागकडे पाहतात आणि म्हणतात की वीरू जी मला सांगतील. मात्र, गांगुली बच्चन यांना सेहवागवर कधीही विश्वास ठेऊ नये, असे सांगतो. हे ऐकून सगळे हसतात. मात्र, अमिताभ चिंताग्रस्त होतात.

यानंतर, ते शोचा होस्ट गांगुलीला विनंती करता, की दादा, आमच्यावर दया करा. यानंतर गांगुली त्यांना एकामागून एक प्रश्न विचारू लागतो. यावर अमिताभ म्हणतात, ”आता कळते की जो इथे बसतो त्याची काय स्थिती असते.” त्यांचे उत्तर ऐकून सेहवाग आणि गांगुलीही हसतात.

 

हेही वाचा – ‘धोनीप्रेमी’ सिद्धार्थ शुक्ला; रिटायरमेटंवेळी केलेली पोस्ट पुन्हा चर्चेत!

सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबत पार पडलेला एपिसोड धमाकेदार असणार आहे. ‘शानदार शुक्रवार’ या खास भागात दादा आणि वीरू यांची जोडी बिग बींसोबत धमाल करणार हे या प्रोमोवरून लक्षात येत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता हा खास एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kbc 13 amitabh bachchan turned contestant as sourav ganguly took over hosting duties watch video adn