दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिका (SA vs IND) संपली आहे. यजमानांनी कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेवरही कब्जा केला. दक्षिण आफ्रिकेने वनडे मालिकेत टीम इंडियाला ३-० असे हरवले. दक्षिण आफ्रिकेने शेवटचा सामना ४ धावांनी जिंकला. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने ६५ धावांची खेळी केली. तो संघाला विजयाकडे घेऊन जात असताना दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने त्याला बाद केले. विराट तंबूत परतल्यानंतर सामना पालटला. ही मालिका जिंकल्यानंतर केशव महाराजने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘जय श्रीराम’ म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे.

सामना संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे सर्व खेळाडू मालिका विजयाचे फोटो आणि पोस्ट शेअर करत होते. केशव महाराजनेही ही मालिका जिंकल्यानंतर इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला. ”आमच्यासाठी ही एक उत्तम मालिका होती. मला या संघाचा अभिमान वाटत आहे. आता पुन्हा एकत्र येण्याची आणि पुढील आव्हान स्वीकारण्याची वेळ आली आहे. जय श्रीराम”, असे महाराजने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले.

हेही वाचा – IND vs SA : वनडे मालिकाही गेली आणि..! टीम इंडियाला बसला अजून एक धक्का; भरावा लागणार दंड!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केशव महाराज हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे. या मालिकेत त्याने उत्तम गोलंदाजी केली. त्याने तीनही सामन्यांमध्ये प्रत्येकी एक बळी घेतला, त्याने विराट कोहलीला शेवटच्या दोन सामन्यांमध्ये बाद केले. याशिवाय पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने शिखर धवनला बाद केले.