Kieron Pollard Breaks Virat Kohli Record: अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत वेस्टइंडिजचा दिग्गज फलंदाज कायरन पोलार्ड एमआय न्यूयॉर्क संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. या संघाचं प्रतिनिधित्व करताना टेक्सास सुपर किंग्ज संघाविरूद्ध खेळताना त्याने १६ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने विराट कोहलीचा टी-२० क्रिकेटमधील मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
एमआय न्यूयॉर्क संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना टेक्सास सुपर किंग्ज संघाविरूद्ध पार पडला. या सामन्यात पोलार्डने १६ चेंडूंचा सामना करत ३२ धावांची खेळी केली. पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६९६ सामन्यांमध्ये १३५६९ धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीच्या नावे टी-२० क्रिकेटमधील ४१४ सामन्यांमध्ये १३५४३ धावा करण्याची नोंद आहे. यासह कायनर पोलार्ड हा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटला मागे सोडत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
टी- क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्टइंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. ख्रिस गेलच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये १४५६२ धावा करण्याची नोंद आहे. हा कारनामा त्याने ४६३ सामन्यांमध्ये केला आहे. तर इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्स या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. हेल्सच्या नावे ४९७ सामन्यांमध्ये १३७०४ धावा करण्याची नोंद आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या शोएब मलिकने ५५७ सामन्यांमध्ये १३५७१ धावा केल्या आहेत.
हे आहेत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
ख्रिस गेल- १४५६२ धावा ( ४६३ सामने)
अॅलेक्स हेल्स- १३७०४ धावा ( ४९७ सामने)
शोएब मलिक- १३५७१ धावा ( ५५७ धावा )
कायरन पोलार्ड- १३५६९ धावा ( ६९६ सामने)
विराट कोहली- १३५४३ धावा ( ४१४ सामने )
विराट कोहलीला मागे सोडणाऱ्या कायरन पोलार्डकडे शोएब मलिकला मागे सोडण्याची संधी असणार आहे. अवघ्या ३ धावा करताच तो शोएब मलिकला मागे सोडू शकतो. कायरन पोलार्डला टी-२० क्रिकेटमध्ये आणखी काही सामने खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे त्याच्याकडे दुसऱ्या स्थानी पोहोचण्याची संधी असणार आहे. १३५ धावा करताच टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहचू शकतो.