KKR vs DC : केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघात धक्कादायक बदल, प्रमुख खेळाडू जखमी

आयपीएल २०२१ च्या ४१  व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे

Shocking changes in KKR and Delhi Capitals squad
दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स (file photo indian express)

आयपीएल २०२१ च्या ४१  व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघात जखमी आंद्रे रसेल आणि प्रशांत कृष्णाच्या जागी टीम साउदी आणि संदीप वॉरियरचा समावेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये पृथ्वी शॉच्या दुखापतीमुळे स्टीव्ह स्मिथला स्थान देण्यात आले. 

दिल्ली दहा सामन्यांत आठ विजयांसह १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर केकेआर सहा पराभव आणि चार विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. दिल्लीने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता, तर चेन्नई सुपर किंग्जच्या हातून केकेआरला पराभवाला सामोरे जावे लागले होते. 

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स – शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, टिम साउदी, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि लॉकी फर्ग्युसन.

दिल्ली कॅपिटल्स – शिखर धवन, स्टीव्हन स्मिथ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरॉन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्किया, आवेश खान.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kkr vs dc shocking changes in kkr and delhi capitals squad srk