IND vs NZ KL Rahul Update on Rohit sharma and Shami: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट टप्प्यातील अखेरचा सामना भारत वि. न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. यानंतर सेमीफायनलचे दोन्ही सामने खेळवले जाणार आहेत. भारत, न्यूझीलंड संघ आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. पण अ गटातून कोणता संघ आधी उपांत्य फेरीत पोहोचणार यासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित न्यूझीलंडविरूद्ध खेळणार नसल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता, यावर राहुलने मोठे अपडेट दिले आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता भारतीय चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली असून ही बातमी केएल राहुलने दिली आहे. भारतीय यष्टीरक्षकाने सांगितले की, कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी शेवटच्या सामन्यासाठी फिट आहेत.

टीम इंडियाचा सामना रविवारी २ मार्च रोजी दुबईत न्यूझीलंडशी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटातील हा शेवटचा सामना असेल. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले असले तरी या सामन्यातील निर्णयावर कोणता संघ पहिला उपांत्य फेरी खेळणार आणि कोणता दुसरा उपांत्य फेरीत प्रवेश करणार हे ठरेल. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे.

मात्र, सामन्याच्या दोन दिवस आधी या सामन्यासाठी भारताचे दोन्ही दिग्गज उपलब्ध असल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेत राहुलने या प्रश्नाचे उत्तर दिले आणि सांगितले की, “माझ्या माहितीप्रमाणे फिटनेसमुळे कोणताही खेळाडू सामन्यातून बाहेर पडेल अशी शक्यता फार कमी आहे.”

यानंतर न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात संघातील इतर खेळाडू खेळणार की नाही, याबाबत बोलताना केएल राहुल म्हणाला, “सेमीफायनलपूर्वी वेगवेगळ्या खेळाडूंना खेळवण्याची इच्छा तर होती, पण मला वाटत नाही की बदल होतील. सेमीफायनलपूर्वी थोडाच वेळ उरला आहे. त्यामुळे संघातील खेळाडूंना जास्तीत जास्त वेळ सामना खेळण्याची संधी मिळेल, याचाच विचार केला जाईल. असं माझं मत आहे, पण गोष्टी बदलू शकतात कारण मी नेतृत्त्व गटाचा भाग नाही.”

२३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा त्रास झाला होता. यामुळे भारतीय कर्णधार काही वेळ मैदानाबाहेरही होता आणि त्याच्या जागी उपकर्णधार शुबमन गिलने संघाची जबाबदारी घेतली होती मात्र, रोहित नंतर मैदानात परतला आणि पुन्हा फलंदाजीलाही आला. मात्र, तरीही त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह कायम आहे. पण रोहितने आज झालेल्या सराव सत्रात फलंदाजीही केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील याच सामन्यात फिटनेसशी संघर्ष करताना दिसला. त्याच्या गुडघ्याला त्रास होत असल्याचे दिसले, ज्यामुळे तो पहिल्या ३-४ षटकांनंतर बराच वेळ मैदानाबाहेर होता. पण शमी मैदानात नंतर परतला आणि त्याने त्याची स्पेलही पूर्ण केली.