scorecardresearch

IPL मध्ये अपयशी ठरलेला मॅक्सवेल ऑस्ट्रेलियात चमकला, वासिम जाफर म्हणतो…गुन्हा है ये !

भारतीय गोलंदाजांची धुलाई करत मॅक्सवेलची नाबाद ६३ धावांची खेळी

भारतीय संघाचा माजी कसोटीपटू वासिम जाफर सध्या सोशल मीडियावर आपली एक नवीन ओळख बनवतो आहे. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं फलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या जाफरने ट्विटरवरुन क्रिकेटशी संबंधित घटनांवर मिम्स शेअर करायला सुरुवात केली आहे.

आतापर्यंत जाफरने अनेक घटनांवर मिम्स शेअर करत आपल्यातला गमतीशीर अंदाज सर्वांना दाखवला आहे. IPL मध्ये पंजाबचं प्रतिनिधीत्व करणारा मॅक्सवेल संपूर्ण हंगामात अपयशी ठरला होता. परंतू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर मॅक्सवेलने सलग दोन सामन्यांत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आहे. मॅक्सवेलच्या या खेळीवर जाफरने भन्नाट मिम शेअर केलं आहे. पाहा, काय म्हणतोय जाफर…

ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. २९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह मॅक्सवेलने नाबाद ६३ धावांची खेळी केली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kxip batting coach wasim jaffer posts another hilarious bollywood meme this time for glenn maxwell psd

ताज्या बातम्या