IPL History News : आयपीएल २०२२ चा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला होता. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा दारुण पराभव केला होता. मुंबईने प्रथम फलंदाजी करत दिल्लीपुढं १७८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दिल्लीने धावांचा पाऊस पाडत १० चेंडू राखून हा सामना खिशात घातला आणि ४ विकेट्सने मुंबईचा पराभव केला. ललित यादव या सामन्याचा हिरो ठरला. ललितने यापूर्वीही अनेक सामन्यांत धडाकेबाज फलंदाजी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई इंडियन्सचा केला पराभव

मुंबई इंडियन्सने नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करत २० षटकांत ५ विकेट्स गमावत १७७ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर दिल्लीने या धावांचा पाठलाग करताना ९.४ षटकात ७२ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर ललित यादव फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. ललितने ३८ चेंडूत ४८ धावांची धडाकेबाज खेळी केली. या इनिंगमध्ये त्याने ४ चौकार आणि २ षटकार ठोकले आणि अक्षर पटेलसोबत ३० चेंडूत नाबाद ७५ धावांची भागिदारी रचली. या भागिदारीच्या जोरावर दिल्लीला मुबंईवर विजय मिळवता आला.

नक्की वाचा – WI vs SA : दक्षिण आफ्रिकेनं केला विश्वविक्रम; वनडे क्रिकेटमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा ठरला पहिला संघ

दोनवेळा ६ चेंडूत ६ षटकार ठोकले

ललित यादव मिडल ऑर्डर फलंदाज आहेच, पण ललित ऑफ स्पिन गोलंदाजी करण्यातही माहिर आहे. ललितला आक्रमक फलंदाजीसाठी ओळखलं जातं. ललित यादवने दोनवेळा ६ चेंडूत ६ षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. त्याने नजफगड स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये खेळवण्यात आलेल्या एका टी-२० सामन्यात ही चमकदार कामगिरी केली होती. ललितने तेव्हा ४६ चेंडूत १३० धावा कुटल्या होत्या. ललित यादव तेव्हा प्रकाशझोतात आला होता, जेव्हा त्याने अंडर-१४ च्या ४० षटकांच्या सामन्यात द्विशतक ठोकलं होतं. ललित नजफगढ येथील रहिवासी असून वीरेंद्र सेहवाग त्याचे आयडॉल आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalit yadav smashes 6 sixes in a over twice in t20 cricket delhi capitals wins against mumbai indians in ipl 2022 nss
First published on: 23-03-2023 at 14:03 IST