scorecardresearch

Premium

Lionel Messi: लिओनेल मेस्सीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! आठव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्काराने सन्मानित

Lionel Messi on Ballon D’Or Award: दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकला आहे. मेस्सीला आठव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Lionel Messi honoured with Ballon d'Or award for the eighth time becomes the first MLS player to win the trophy
दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Lionel Messi on Ballon D’Or Award: दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकला आहे. मेस्सीला आठव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकणारा मेस्सी पहिला एस.एल.एस. खेळाडू ठरला आहे. इंटर मियामीचे मालक आणि फुटबॉल लिजेंड डेव्हिड बेकहॅम यांनी मेस्सीला हा सन्मान दिला आहे. लिओनेल मेस्सीने यापूर्वी २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१९ आणि २०२१ मध्ये बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकला आहे.

बॅलन डी‘ओर पुरस्कार किती खास आहे हे जाणून घ्या

माहितीसाठी की, बॅलन डी’ओर हा फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे, जो वैयक्तिक खेळाडूला दिला जाणारा सन्मान आहे. फुटबॉल क्लब आणि राष्ट्रीय संघातील खेळाडूला त्याच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

shahrukh-khan-dadasaheb-phalke-award
“मला पुन्हा…”, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर शाहरुख खानने व्यक्त केल्या मनातील भावना
Fali S Nariman
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले भारताचे ज्येष्ठ विधिज्ञ फली एस नरिमन यांचं निधन
Grammy Award
पाच भारतीयांची ग्रॅमी पुरस्कारांवर मोहर; झाकीर हुसेन तीन, तर राकेश चौरसिया दोन पुरस्कारांचे मानकरी
Zakir Hussain Shankar Mahadevan won Grammy Awards 2024
‘ग्रॅमी अवॉर्ड’मध्ये भारतीयांचा डंका! झाकीर हुसेन यांना तीन पुरस्कार, तर शंकर महादेवन यांनीही मारली बाजी, वाचा विजेत्यांची यादी

जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला फुटबॉलपटूच यासाठी पात्र आहेत

१९५६ पासून दरवर्षी पुरुषांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

२०१८ पासून सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंना बॅलन डी’ओर देण्याची परंपरा सुरू झाली आहे.

२०२० मध्ये कोविड महामारीमुळे हा पुरस्कार देता आला नाही.

हेही वाचा: IND vs ENG: टीम इंडियाच्या शानदार कामगिरीवर सुनील गावसकरांचे मोठे विधान; म्हणाले, “जे कपिल देव करायचा ते शमी…”

मेस्सीपूर्वी, सध्याच्या कोणत्याही एम.एल.एस. खेळाडूने बॅलन डी’ओर जिंकला नव्हता. अनेक माजी विजेत्यांनी अमेरिकेत आपली कारकीर्द संपवली आहे, परंतु लीगमधील सक्रिय खेळाडू म्हणून हा पुरस्कार जिंकणारा लिओनेल मेस्सी हा पहिला खेळाडू ठरला आहे. बॅलन डी’ओर शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या एर्लिंग हॅलंडने मात्र गर्ड मुलर ट्रॉफी जिंकली. गेल्या मोसमात त्याने ५२ गोल केले आणि त्याचा संघ मँचेस्टर सिटीने ट्रेबल जिंकला.

आठव्यांदा बॅलोन डी’ओर जिंकल्यानंतर मेस्सी म्हणाला, “मी कारकिर्दीत जे यश मिळवले त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. जे काही मी साध्य केले त्याचा मला अभिमान आहे. मला जगातील सर्वोत्तम संघ, इतिहासातील सर्वोत्तम संघाकडून खेळण्याचा बहुमान मिळाला आहे. ही वैयक्तिक ट्रॉफी जिंकणे जरी छान वाटत असले तरी अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक जिंकवून देणे हा क्षण माझ्यासाठी खास होता.” मेस्सी पुढे म्हणाला, ‘कोपा अमेरिका आणि त्यानंतर विश्वचषक जिंकणे, हे यश मिळवणे खूप अभिमानास्पद आहे. हे सर्व बॅलन डी’ओर पुरस्कारापेक्षा खूप खास आहे.”

हेही वाचा: SL vs AFG: श्रीलंकेची सेमीफायनलची वाट बिकट! अफगणिस्तानचा सात गडी राखून ऐतिहासिक विजय, रहमत शाह चमकला

मेस्सीच्या आधी, बार्सिलोना आणि स्पेनची मिडफिल्डर एटाना बोनामतीने क्लब आणि देशाकडून खेळताना बॅलोन डी’ओर फेमिनिन जिंकले. स्पेनला विश्वचषक गौरवापर्यंत नेण्याआधी, त्याने बार्सिलोनाला गेल्या मोसमात ‘लीगा एफ’ आणि ‘चॅम्पियन्स लीग’ जिंकण्यास मदत केली. जर इतर पुरस्कारांबद्दल बोलायचे तर, मेस्सीचा अर्जेंटिनाचा सहकारी एमिलियानो मार्टिनेझ याने सर्वोत्कृष्ट गोलकीपर म्हणून याशिन ट्रॉफी जिंकली आणि इंग्लंड आणि रिअल माद्रिदचा मिडफिल्डर ज्यूड बेलिंगहॅम याला कोपा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २१ वर्षांखालील जगातील अव्वल खेळाडू म्हणून ही ट्रॉफी देण्यात येते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lionel messi honoured with ballon dor award for the eighth time became the first player mls to win the trophy avw

First published on: 31-10-2023 at 13:53 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×