बार्सिलोना क्लबचा अव्वल खेळाडू लिओनेल मेसीने वैयक्तिक कारणामुळे ला लिगा फुटबॉलमधील मलगा क्लबविरुद्धच्या लढतीतून माघार घेतल्याची माहिती क्लबतर्फे शनिवारी देण्यात आली. मेसीच्या गैरहजेरीत बचावपटू येरी मिनाला संधी देण्यात आली आहे.अर्जेटिनाच्या मेसीने ला लिगामधील गेल्या तीन सामन्यांत चार गोल केले आहेत. सध्या बार्सिलोना ११ गुणांच्या आघाडीसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीगमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात चेल्सीचा सामना करायचा आहे आणि त्या महत्त्वाच्या लढतीत मेसीला विश्रांती मिळणेही गरजेचे होते. उभय क्लबमध्ये पहिल्या टप्प्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lionel messi withdraws from barcelona squad for personal reasons
First published on: 11-03-2018 at 02:46 IST