राजधानी दिल्लीत भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. फिरोजशहा कोटला स्टेडियमवर झालेल्या या रंगतदार लढाईत न्यूझीलंडने ६ धावांनी विजय प्राप्त केला. सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. न्यूझीलंडच्या २४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून केदार जाधवची ४१ धावांची खेळी वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. कर्णधार धोनीने भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण यावेळी तो मॅच विनर ठरू शकला नाही. साऊदीच्या गोलंदाजीवर धोनी (३९) झेलबाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्याने भारतीय संघाच्या विजयाची आशा अखेरच्या षटकापर्यंत जिवंत ठेवली होती. मात्र हार्दिक ३६ धावांवर बाद झाल्यानंतर संघाच्या विजयाच्या आशा पूर्णपणे मावळल्या. अखेरच्या षटकात टीम साऊदीने बुमराहला शून्यावर माघारी धाडून किवींनी विजयी जल्लोष साजरा केला. उमेश यादवने नाबाद १८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी साधली आहे. न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात अतिशय संथ गतीने झाली होती. त्यात रोहित शर्मा केवळ १५ धावा करून माघारी परतला. तर कोहली देखील यावेळी आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. कोहली (९) सँटनरच्या फिरकीवर यष्टीरक्षक ल्युक राँचीकरवी झेलबाद झाला. रहाणे देखील मोठा फटका मारण्याच्या नादात अँडरसनकरवी झेलबाद होऊन माघारी परतला. संघातील अनुभवी फलंदाज स्वस्तात तंबूत दाखल झाल्यानंतर धोनीने केदार जाधवच्या साथीने संघाचा डाव सावरण्यास सुरूवात केली होती. केदार जाधवने यावेळी विश्वासू खेळी साकारली. त्याने ३७ चेंडूत ४१ धावा केल्या. तत्पूर्वी,  न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या शतकी खेळीच्या जोरावर किवींना यावेळी २४२ धावांपर्यंत मजल मारता आली. लॅथमने ४६ धावांचे योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणताही न्यूझीलंडचा फलंदाच चांगली कामगिरी करू शकला नाही. विल्यमसन ११८ धावांवर बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ गडगडला. अखेरच्या दहा षटकांत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंच्या धावसंख्येला चांगलाच लगाम घातला.  भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. धोनीचा निर्णय सार्थकी लावत उमेश यादवने पहिल्याच षटकात मार्टिन गप्तील याला क्लीनबोल्ड करून दमदार सुरूवात करून दिली. मात्र, त्यानंतर आलेल्या केन विल्यमसनने यावेळी विश्वासू खेळी साकारून संघाचा डाव सावरला. विल्यमसनने टॉम लॅथमच्या साथीने दुसऱया विकेटसाठी तब्बल १२० धावांची भागीदारी रचली. विल्यमसन आणि लॅथम जोडी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत होती. अशावेळी धोनीने गोलंदाजीत बदल करून केदार जाधवला गोलंदाजीस पाचारण केले आणि त्याने भारतीय संघाला यश मिळवून दिले. जाधवने लॅथमला माघारी धाडून भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. लॅथम बाद झाल्यानंतरही विल्यमसनने रॉस टेलरला साथीला घेऊन आपले शतक पूर्ण केले. विल्यमसनचे हे भारतीय संघाविरुद्धचे पहिलेवहिले एकदिवसीय शतक ठरले. तर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील त्याचे हे आठवे शतक आहे.  रॉस टेलरवर अमित मिश्राने चांगला दबाव निर्माण केला होता, मग धावसंख्येला गती देण्याच्या नादात रॉस टेलरने मोठा फटका मारण्याची चूक केली. टेलर २१ धावांवर झेलबाद झाला. त्यापाठोपाठ केन विल्यमसन देखील ११८ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. विल्यमसन बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. ठराविक अंतराने न्यूझीलंडच्या विकेट्स एकामागोमाग एक पडत राहिल्या आणि सरतेशेवटी किवींनी २४२ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून बुमराह आणि मिश्रा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव, अक्षर पटेल आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. Live Cricket Score of India vs New Zealand :
Live Updates
19:58 (IST) 20 Oct 2016
केदार जाधव बाद झाल्यानंतर अक्षर पटेल मैदानात दाखल, भारत ५ बाद १४० धावा
19:56 (IST) 20 Oct 2016
भारताला पाचवा धक्का, केदार जाधव ४१ धावांवर बाद
19:54 (IST) 20 Oct 2016
केदार जाधवने ४० धावांचा टप्पा ओलांडला, भारत ४ बाद १३९ धावा
19:52 (IST) 20 Oct 2016
धोनीचा स्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत चौकार, भारत ४ बाद १३४ धावा
19:40 (IST) 20 Oct 2016
केदार जाधवचा डीप स्वेअर लेगला चौकार, धोनी आणि जाधवची अर्धशतकी भागीदारी
19:39 (IST) 20 Oct 2016
केदार जाधवचा डीप एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने उत्तुंग षटकार, भारत ४ बाद ११८ धावा
19:32 (IST) 20 Oct 2016
धोनीचा खणखणीत कव्हर ड्राईव्ह, भारत ४ बाद १०८ धावा
19:30 (IST) 20 Oct 2016
केदार जाधवचा उत्तुंग षटकार, भारत ४ बाद १०३ धावा
19:23 (IST) 20 Oct 2016
केदार जाधवचा स्विप शॉट चौकार, भारत ४ बाद ९१ धावा
19:19 (IST) 20 Oct 2016
धोनीचा डीप स्वेअर लेगला चौकार, भारत ४ बाद ८५
19:17 (IST) 20 Oct 2016
२२ षटकांच्या अखेरीस भारत ८१/४ (धोनी- २, जाधव- ५ )
19:16 (IST) 20 Oct 2016
केदार जाधवकडून फाईन लेगवर एक धाव
19:16 (IST) 20 Oct 2016
केदार जाधवचा स्विप शॉट, दोन धावा
19:11 (IST) 20 Oct 2016
२० षटकांच्या अखेरीस भारत ४ बाद ७४ धावा. (धोनी- ० , जाधव- १ )
19:09 (IST) 20 Oct 2016
दोन धावा घेण्याच्या नादात मनिष पांडे धावचीत
19:09 (IST) 20 Oct 2016
रहाणेपाठोपाठ पुढच्याच षटकात मनिष पांडे देखील तंबूत दाखल
19:01 (IST) 20 Oct 2016
तिसऱया पंचांनी राहणे ठरवले बाद, रहाणे २८ धावा करून माघारी
18:57 (IST) 20 Oct 2016
अँडरसनच्या झेलबाबत पंच साशंक, निर्णय तिसऱया पंचांकडे
18:57 (IST) 20 Oct 2016
राहणेचा टीम साऊदीच्या गोलंदाजीवर दमदार शॉट, पण कोरे अँडरसनने झेल टीपला
18:48 (IST) 20 Oct 2016
रहाणेचा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार, भारत २ बाद ६६ धावा
18:42 (IST) 20 Oct 2016
मनिष पांडेचा मिड विकेटच्या दिशेने फ्लॅट षटकार, भारत २ बाद ५५ धावा
18:41 (IST) 20 Oct 2016
रहाणेचा झेल टीपण्याची संधी न्यूझीलंडने गमावली
18:38 (IST) 20 Oct 2016
१३ षटकांच्या अखेरीस भारत २ बाद ४५ (रहाणे- १६ , पांडे- ३ )
18:35 (IST) 20 Oct 2016
विराट कोहली बाद झाल्यानंतर मनिष पांडे फलंदाजीसाठी मैदानात दाखल
18:34 (IST) 20 Oct 2016
भारतीय संघाला मोठा धक्का, विराट कोहली (९) झेलबाद ; मिचेल सँटनरने घेतली विकेट
18:31 (IST) 20 Oct 2016
केन विल्यमसनचे मिड विकेटवर चांगले क्षेत्ररक्षण
18:31 (IST) 20 Oct 2016
मिचेल सँटनर टाकतोय न्यूझीलंडचे १२ वे षटक
18:30 (IST) 20 Oct 2016
११ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ३९ धावा.
18:27 (IST) 20 Oct 2016
कोहलीचा शानदार कव्हर ड्राईव्ह, भारत १ बाद ३५ धावा. (रहाणे- १२ , कोहली-८ )
18:26 (IST) 20 Oct 2016
अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्यात विसंवादामुळे चुकामूक, रहाणेला धावचीत करण्याची किवींना संधी, रहाणे सुदैवाने बचावला.
18:24 (IST) 20 Oct 2016
कोहली आणि रहाणे यांचे स्ट्राईक रोटेशन, भारत बिनबाद ३० धावा.
18:22 (IST) 20 Oct 2016
९ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद २९ धावा
18:22 (IST) 20 Oct 2016
अजिंक्य राहणेचा नजाकती चौकार, भारत १ बाद २९ धावा
18:20 (IST) 20 Oct 2016
थर्ड मॅनच्या दिशेने राहणेचे फटका, एक धाव
18:19 (IST) 20 Oct 2016
८ षटकांच्या अखेरीस भारताची धावसंख्या २२/१ (रहाणे- ६, विराट- १ )
18:18 (IST) 20 Oct 2016
रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात दाखल
18:17 (IST) 20 Oct 2016
ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा यष्टीरक्षक राँचीकरवी झेलबाद होऊन माघारी
18:15 (IST) 20 Oct 2016
भारतीय संघाला पहिला धक्का, रोहित शर्मा झेलबाद
18:13 (IST) 20 Oct 2016
७ षटकांच्या अखेरीस भारत बिनबाद २१ धावा. (रोहित – १५ , रहाणे- ६)
18:09 (IST) 20 Oct 2016
ट्रेंट बोल्टकडून लागोपाठ दुसरे निर्धाव षटक, भारत बिनबाद १८ धावा.
18:05 (IST) 20 Oct 2016
रोहित शर्माकडून शानदार चौकार, भारत बिनबाद १८ धावा.
18:03 (IST) 20 Oct 2016
संयमी सुरूवातीनंतर रोहितचे आक्रमक रुप, हेन्रीला खणखणीत षटकार
18:01 (IST) 20 Oct 2016
ट्रेंट बोल्टकडून निर्धाव षटक, भारत बिनबाद ७ धावा
17:59 (IST) 20 Oct 2016
रोहित शर्माकडून संयमी फलंदाजी, १२ चेंडूत केल्यात फक्त दोन धावा.
17:57 (IST) 20 Oct 2016
तिसऱया षटकाच्या अखेरीस भारत बिनबाद ७ धावा. (रोहित-२, रहाणे- ५ )
17:57 (IST) 20 Oct 2016
ट्रेंट बोल्टच्या षटकात रहाणेकडून चौकार, भारत बिनबाद ६ धावा.
17:56 (IST) 20 Oct 2016
भारतीय संघाच्या डावाला सुरूवात, पहिल्या षटकात केवळ दोन धावा.
17:17 (IST) 20 Oct 2016
न्यूझीलंडच्या ५० षटकांत २४२ धावा. भारतीय संघासमोर विजयासाठी २४३ धावांचे आव्हान
17:13 (IST) 20 Oct 2016
थर्ड मॅनच्या दिशेने चौकार,न्यूझीलंड ९ बाद २४१
17:11 (IST) 20 Oct 2016
पुढच्याच चेंडूवर बुमराहने घेतली हेन्रीची विकेट, बुमराहच्या यॉर्करवर हेन्री क्लीनबोल्ड
Web Title: Live cricket score india vs new zealand ind vs nz 2nd odi video streaming commentary result highlights delhi
First published on: 20-10-2016 at 12:54 IST