मानाच्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक असलेली विम्बल्डन टेनिस स्पर्धा लंडनमध्ये सुरू आहे. आज (१० जुलै) या स्पर्धेचा शेवट होत आहे. या स्पर्धेमध्ये वरिष्ठ गटांशिवाय कनिष्ठ गटांतील खेळाडूंचे सामने आयोजित केले जातात. यावर्षी कनिष्ठ गटामध्ये महाराष्ट्राच्या ऐश्वर्या जाधवने आपला झेंडा रोवला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी तिच्या या कामगिरीची दखल घेतली आहे. दोघांनीही ट्वीट करून तिचे कौतुक केले आहे.

कोल्हापुरातील ऐश्वर्या जाधव हिने लंडन येथील विम्बल्डन ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत खेळ केला. तिने शानदार खेळ करून उपस्थित टेनिस चाहत्यांची मने जिंकली. जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या अँड्रिया सूरविरुद्ध खेळताना ऐश्वर्याने सर्व्हिससह इतर वेगवान फटके मारले. तिला विजय मिळवता आला नाही. मात्र, तरीदेखील तिच्या कामगिरीचे भारतभर कौतुक होत आहे.

Child Marriage
मैत्रिणी असाव्यात तर अशा! बालविवाह रोखण्यासाठी थेट चाईल्ड हेल्पलाईनला फोन; १२ वर्गमैत्रिणींची केली ‘अशी’ सुटका!
10th Board Exam Topper Heer Ghetiya Dies
१० वीला ९९.७० टक्के मिळवणाऱ्या हीरचा निकालानंतर चार दिवसातच मृत्यू; वडिलांचा निर्णय वाचून मन हळहळेल
LIC first installment income from new customers hits 12 year high with Rs 12383 crore in April up 113 percent
एलआयसीचे नवीन ग्राहकांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्न १२ वर्षांच्या उच्चांकी; एप्रिल महिन्यात १२,३८३ कोटींसह ११३ टक्के वाढ
Dr Narendra Dabholkar Murder case pune court verdict
Narendra Dabholkar Murder : ११ वर्षांनंतर निकाल; दोन आरोपींना जन्मठेप, सबळ पुराव्याअभावी तिघे निर्दोष
KL Rahul Sanjeev Goenka video viral
केएल राहुल लखनऊची साथ सोडणार? LSGचे मालक संजीव गोयंका यांच्याबरोबरचा VIDEO व्हायरल झाल्यांनंतर चर्चांना उधाण
loksatta analysis conflict between the majority maitei and minority kuki tribes in manipur
विश्लेषण : मणिपूर हिंसाचाराची वर्षपूर्ती… शाश्वत शांतता नांदणार कधी? 
people cheated, tourism,
दक्षिण आफ्रिकेतील पर्यटनाच्या नावाखाली १० जणांची फसवणूक, ३२ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्ह दाखल
Vasai, Death sanitation workers,
वसई : सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू; राष्ट्रीय सफाई आयोगाकडून कारवाईचे निर्देश, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३० लाखांची मदत

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून ऐश्वर्याचे कौतुक केले. “राजकारण रोजचेच आहे. त्या पलीकडे देखील जग आहे. महाराष्ट्राची ही कन्या देशाचे प्रतिनिधित्व करते आहे. जय महाराष्ट्र !”, असे ट्वीट राऊत यांनी केले. तर, आदित्य ठाकरे यांनी तिला ‘शायनिंग स्टार’ म्हटले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून ऐश्वर्याने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात चमकदार खेळ करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. त्यामुळेच तिची विम्बल्डनमधील १४ वर्षांखालील मुलींच्या टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली होती. दोन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय टेनिस संघटनेने ‘आयटीएफ वर्ल्ड अंडर-१४’ मुलींच्या टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऐश्वर्या जाधवने चार सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे तिची विम्बल्डनसाठी निवड झाली होती.