Andre Russell dances with Ananya Pandey on SRK lut put gay song: आयपीएल २०२४ च्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह केकेआर संघाने तिसऱ्यांदा आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावले. चॅम्पियन झाल्यानंतर संपूर्ण केकेआर संघ विजयाच्या जल्लोषात मग्न झाला होता. सोशल मीडियावर पार्टीमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ स्टार खेळाडू आंद्रे रसेलचा आहे, जो बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत किंग खानच्या गाण्यावर डान्स करतानाचा आहे.
व्हायरल व्हीडिओमध्ये आंद्रे रसेलच्या हातात ग्लास असून तो शाहरुख खानच्या गाण्यावर डान्स करण्याचा आनंद घेत आहे. रसेल शाहरुख खानच्या डंकी चित्रपटातील लूट-पुट गया या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. याआधीही रसेल या गाण्यावर रिल बनवताना दिसला आहे. पण यावेळेस त्याच्यासोबत अनन्या पांडेही थिरकताना दिसत आहे. रसेलचा सहकारी रमणदीप सिंग आणि केकेआरचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडितही याच गाण्यावर नाचताना दिसत आहेत. अनन्या पांडे सुहाना खानसोबत केकेआऱच्या सर्वच सामन्यांमध्ये संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होती.
कोलकाताला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनवण्यात आंद्रे रसेलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या मोसमात त्याने १५ सामन्यात २२२ धावा केल्या आणि १९ विकेटही घेतले. इतकेच नव्हे तर अंतिम सामन्यात त्याने संघासाठी सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर अजून एका व्हायरल व्हीडीओमध्ये केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, वरूण चक्रवर्ती आणि रमणदीप सिंग हे देसी बॉईज या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
आयपीएल २०२४ चा अंतिम सामना पूर्णपणे एकतर्फी झाला आहे. या अंतिम सामन्यात सनरायझर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ही एकमेव गोष्ट हैदराबाद संघाच्या बाजूने गेली. मात्र, सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्सचा हा निर्णय त्याला महागात पडला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स संघ अवघ्या ११३ धावांवर सर्वबाद झाला. स्वतः कर्णधार पॅट कमिन्सने संघाकडून सर्वाधिक २४ धावा केल्या.
हेही वाचा – हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, भाऊ कृणालच्या पोस्टवरील पंड्याच्या बायकोची कमेंट व्हायरल
अवघ्या ११३ धावांवर हैदराबादला ऑल आऊट केल्यानंतर केकेआरने १०.३ षटकांत हे सोपे लक्ष्या सहज गाठले आणि जेतेपद आपल्या नावे केले. लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने केवळ दोन विकेट गमावल्या. अशा स्थितीत केकेआर संघाने अंतिम सामन्यात सहज विजय संपादन केला. केकेआरने पहिली विकेट गमावल्यानंतर व्यंकटेश अय्यरने शानदार फलंदाजी केली. अय्यरने २०० च्या स्ट्राईक रेटने २६ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. याशिवाय रहमनुल्ला गुरबाजनेही ३९ धावांचे योगदान दिले.