महाराष्ट्र कबड्डी संघटनेने ६७ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी राज्याच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा केली आहे. २ ते ६ मार्चदरम्यान राजस्थानमधील जयपूर शहरात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदाच्या संघात निवड समितीने अनुभवी खेळाडूंना वगळून युवा खेळाडूंवर जबाबदारी सोपवली आहे. रिशांक देवाडीगा, विशाल माने, गिरीश एर्नाक या खेळाडूंना विश्रांती देण्यात आलेली असून खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनीधीत्व केलेल्या पंकज मोहीते, अजिंक्य पवार यांना संघात स्थान देण्यात आलेलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असा असेल महाराष्ट्राचा पुरुषांचा कबड्डी संघ –

तुषार पाटील, अजिंक्य पवार, पंकज मोहीते, बिपीन थले, मनोज बोंद्रे, स्वप्नील शिंदे, शुभम शिंदे, संकेत सावंत, आकाश कदम, सुशांत सैल, रोहित बने, महारुद्र गर्जे

असा असेल महाराष्ट्राचा महिलांचा कबड्डी संघ –

मेघा कदम, पौर्णिमा जेधे, पुजा शेलार, पुजा जाधव, श्रद्धा, सायली जाधव, सोनाली हेलवी, अंकिता जगताप, सुवर्णा लोखंडे, तेजस्वी पाटेकर, निकीता कदम, ऐश्वर्या काळे

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra mens and womens squad for the 67th senior national kabaddi championship announced psd
First published on: 25-02-2020 at 11:37 IST