केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राच्या मयुरेश पवार या नेटबॉलपटूचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱया या स्पर्धेत मयुरेश पवार महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करत होता. चंदिगड विरुद्धच्या सामन्यानंतर छातीत दुखत असल्याची तक्रार मयुरेशला जाणवली. दुखणे वाढल्यानंतर मयुरेशला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान मयुरेशला हृद्यविकाराचा तीव्र झटका आला आणि या युवा नेटबॉलपटूचा अंत झाला. मयुरेशच्या अशा या दुर्देवी जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2015 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राच्या नेटबॉलपटूचा मृत्यू
केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राच्या मयुरेश पवार या नेटबॉलपटूचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडला.
First published on: 02-02-2015 at 03:36 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra netball player succumbs to cardiac arrest