११ ते १४ जुलै दरम्यान बिहारमधील पाटणा शहरात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. सिन्नर-नाशिक येथे झालेल्या ६६ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतून अंतिम संघाची निवड करण्यात आली आहे. पुण्याच्या सायली केरीपाळेकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. अंतिम १२ खेळाडूंमध्ये राज्य अजिंक्यपद विजेते पुणे संघाच्या ५ खेळाडूंची निवड झाली आहे. तर उपविजेते मुंबई उपनगरच्या २ खेळाडूंची निवड झाली आहे. ठाणे, रत्नागिरी, मुंबई शहर, नाशिक व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी १ खेळाडु अंतिम १२ मध्ये स्थान मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार व संघ व्यवस्थापक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मनिषा गावंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाणून घ्या अंतिम १२ जणांचा संघ –

अर्चना करडे (ठाणे), श्रद्धा पवार (रत्नागिरी), दीपिका जोसेफ (पुणे), अंकिता जगताप (पुणे), स्नेहल शिंदे (पुणे), सायली केरिपाळे (कर्णधार, पुणे), आप्रमाली गलांडे (पुणे), कोमल देवकर (मुंबई उपनगर), सोनाली हेळवी (सातारा), पूजा यादव (मुंबई शहर), ज्योती पवार (नाशिक), सायली नागवेकर (मुंबई उपनगर)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra womens kabaddi team declarer for national games in bihar psd91
First published on: 04-07-2019 at 17:42 IST