मुंबईचा अव्वल पुरुष स्क्वॉशपटू महेश माणगांवकरला गत वर्षांतील चमकदार कामगिरीमुळे महाराष्ट्र सरसकारने पाच लाख रुपयांचे विशेष पारितोषिक दिले आहे. महेशला विशेष पारितोषिक मिळावे यासाठी स्क्वॉश रॅकेट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेने पाठपुरावा केला होता. महेश भारतात नसल्याने शासनाने पाच लाखांचा धनादेश त्याच्या घरी पाठवला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचा तो भाग होता. त्याचबरोबर त्याने गेल्या वर्षी दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या जेतेपदाला गवसणी घातली होती, तर तीन स्पर्धांमध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
सध्या महेश बोस्टनमध्ये असून अमेरिकेचे प्रशिक्षक शॉन मोक्सहॅम यांच्याकडून धडे घेत आहे.