पीटीआय, क्वालालंपूर : भारताच्या एच. एस. प्रणॉयने रविवारी तीन गेमपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात चीनच्या वेंग हाँग येंगला पराभूत करत मलेशिया मास्टर्स (सुपर ३०० दर्जा) बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. प्रणॉयला तब्बल सहा वर्षांच्या कालावधीनंतर एखादी स्पर्धा जिंकण्यात यश आले.  प्रणॉयचे ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक मालिकेतील स्पर्धेचे हे पहिले जेतेपद ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० वर्षीय प्रणॉयने ९४ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात चीनच्या जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानी असणाऱ्या वेंगवर २१-१९, १३-२१, २१-१८ असा विजय मिळवला. प्रणॉयने गेल्या वर्षी थॉमस चषकात भारताच्या ऐतिहासिक यशात निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र, २०१७च्या अमेरिकन खुल्या ग्रां. प्री. गोल्ड स्पर्धेनंतर त्याने कुठलेही जेतेपद मिळवले नव्हते. केरळचा हा खेळाडू गेल्या वर्षी स्विस खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र, त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय प्रणॉयने मलेशिया आणि इंडोनेशिया (सुपर १००० दर्जा) स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती; परंतु तो जेतेपदापासून दूरच राहिला. मलेशिया मास्टर्स स्पर्धेत मात्र त्याने जेतेपद पटकावले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaysia masters badminton tournament prannoy wins title ysh
First published on: 29-05-2023 at 01:01 IST