ग्लास्गो येथे २३ जुलैपासून होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या भारतीय बॉक्सिंग संघातून पाच वेळा विश्वविजेती ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिला वगळण्यात आले आहे. तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करणाऱ्या मेरी कोमला पतियाळा येथे नुकत्याच झालेल्या सराव शिबिरात अंतिम फेरीत पिंकी जांगरा (५१ किलो) हिने पराभूत केले होते. ‘‘ही लढत अटीतटीची झाली. आता राष्ट्रकुल स्पर्धेत पिंकीने पदक जिंकावे, यासाठी मी तिला शुभेच्छा देते,’’ असे मेरी कोम हिने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2014 रोजी प्रकाशित
मेरी कोमला वगळले
ग्लास्गो येथे २३ जुलैपासून होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या भारतीय बॉक्सिंग संघातून पाच वेळा विश्वविजेती ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिला वगळण्यात आले आहे.
First published on: 24-05-2014 at 12:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mary kom dropped from indian boxing squad for