भारताला विश्वविजेता बनवणारा कप्तान उन्मुक्त चंद आता उद्या ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेट लीग बिग बॅशमध्ये पदार्पण सामना खेळणार आहे. २०१२ मध्ये आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद आता बिग बॅशमध्ये खेळताना दिसणार आहे. बिग बॅश लीग खेळणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. होबार्ट हरिकेन्सविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. उन्मुक्त चंद उद्या मेलबर्नच्या डॉकलँड्स स्टेडियमवर मेलबर्न रेनेगेड्स संघासाठी पदार्पण सामना खेळणार आहे.

उन्मुक्त चंदने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो अमेरिकेला गेला. यादरम्यान त्याने बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्ससोबत करार केला, जिथे त्याला अद्याप संपूर्ण हंगामात खेळण्याची संधी मिळाली नाही. पण आता तो संघासाठी खेळणार आहे.

हेही वाचा – ‘‘विराट भावा तू खरा…”, कोहलीसाठी भावूक झाला पाकिस्तानचा मोहम्मद आमिर; एका ट्वीटनं जिंकली लाखोंची मनं!

उन्मुक्त चंदची कारकीर्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उन्मुक्तने ६७ कसोटीत ३१.५७च्या सरासरीने ३३७९ धावा केल्या. त्याने या फॉरमॅटमध्ये आठ शतके आणि १६ अर्धशतके केली. याचबरोबर त्याने १२० लिस्ट ए सामन्यांमध्ये ४५०५ धावा केल्या. येथे त्याच्या नावावर सात शतके आणि ३२ अर्धशतके होती. उन्मुक्तने ७७ सामन्यांमध्ये तीन शतके आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने १५६५ धावा केल्या. २०१२चा १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकल्यानंतर तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १११ धावांची नाबाद खेळी केली आणि भारताला विश्वचषक जिंकून दिला.