भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने माजी कर्णधार आणि सहकारी खेळाडू विराट कोहलीसाठी खास पत्र लिहिले आहे. या पत्रासोबत युवराजने विराटसाठी खास भेटही पाठवली आहे. तू माझ्यासाठी नेहमीच चीकू राहशील आणि जगासाठी किंग कोहली, असे युवराजने म्हटले आहे. विराट कोहलीने सप्टेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले आहे आणि आता तो एक फलंदाज म्हणून संघाशी जोडला गेला आहे.

“विराट, मी तुला क्रिकेटर आणि माणूस म्हणून मोठं होताना पाहिले आहे. नेटवर दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून चालणारा एक तरुण मुलगा आता नव्या पिढीसाठी आख्यायिका बनली आहे. मैदानावरील तुझी आवड आणि शिस्त आणि या खेळाप्रती तुझे समर्पण हे देशातील प्रत्येक तरुणाला बॅट उचलून निळ्या जर्सीमध्ये खेळण्यासाठी प्रेरित करते. या अप्रतिम खेळात तू दरवर्षी तुझ्या क्रिकेट खेळण्याचा स्तर उंचावला आहे आणि अनेकदा यश संपादन केले आहे. तू एक उत्तम कर्णधार आणि महान नेता आहेस, असे युवराज सिंगने आपल्या पत्रात म्हटले आहे.

Raj Thackeray
महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेची पुढची भूमिका काय? राज ठाकरेंनी दिली सविस्तर माहिती, म्हणाले…
chandrashekhar bavankule raj thackeray marathi news
मोदींना साथ देण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीसोबत यावे – बावनकुळे
Nagpur Woman Harassed and Intimidated by accused to not give testimony Against him
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…
lok sabha muhurt marathi news, lok sabha marathi news
उमेदवारी अर्जासाठी मुहुर्ताची लगबग

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम करणाऱ्या युवराजने कोहलीसोबत घालवलेल्या आठवणीही सांगितल्या. यामध्ये देशासाठी धावा करण्यासोबत मैदानाबाहेरचे हलक्या क्षणांची युवराजने आठवण करुन दिली आहे.

“मला तुला आणखी अनेक धावा काढताना पाहायचे आहे. मी आनंदी आहे की आपण एक सहकारी आणि मित्र म्हणून नाते निर्माण केले आहे. एकत्र धावा काढणे, लोकांची खेचणे, पंजाबी गाण्यांवर नाचणे आणि स्पर्धा जिंकणे, हे सर्व आपण मिळून केले आहे. मेरे लिए तू हमेशा चीकू रहेगा और दुनिया के लिए किंग कोहली. ती आग तुमच्या आत सतत तेवत ठेव. तू सुपरस्टार आहेस. तुझ्यासाठी खास गोल्डन बूट,” असे युवराजने पुढे म्हटले आहे.

कोहलीचा स्पोर्ट्स ब्रँड पुम्यासोबत जवळचा संबंध असल्याने युवराजने त्याला गोल्डन बूटांची विशेष आवृत्ती भेट म्हणून दिली आहे.