भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या चपळ यष्टीरक्षणासाठी ओळखला जातो. काही सेंकदाच्या आत यष्टिचित करण्याच्या बाबतीत धोनी सुपरफास्ट आहे. सध्या सुरू असलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये वारविक्शायर संघाचा यष्टीरक्षक मायकेल बर्गेसने अशाच पद्धतीचा यष्टीरक्षणाचा अप्रतिम नमुना सादर केला आहे. नॉटिंगहॅमशायरविरुद्ध सामन्यात बर्गेसने फलंदाजाला झटपट यष्टिचित करत सर्वांना थक्क केले.

नॉटिंगहॅमशायरच्या दुसऱ्या डावात फलंदाज जो क्लार्कला बर्गेसने यष्टिचित केले. गोलंदाज ओजे हॅनन-डाल्बीने लेग साईडला टाकला, त्यानंतर बर्गेसने पुढे गेलेल्या क्लार्कला पाहत चित्याच्या गतीने यष्टिचित केले.

हेही वाचा – क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! १७ सप्टेंबरपासून रंगणार आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा

 

हेही वाचा – जगातील पहिल्या नंबरच्या महिला टेनिसपटूला बसला १५,००० डॉलर्सचा दंड!

काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळल्या गेलेल्या ग्रुप ‘अ’ सामन्यात वारविक्शायरने नॉटिंगहॅमशायरला १७० धावांनी पराभूत केले. नॉटिंगहॅमशायरने दुसर्‍या डावात केवळ १३८ धावा केल्या. वारविक्शायरने पहिल्या डावात ३४१ आणि २६४ धावा केल्या होत्या, तर नॉटिंगहॅमशायरचा संघ पहिल्या डावात २९७ आणि दुसऱ्या डावात फक्त १३८ धावा करू शकला.

या सामन्यात फिरकीपटू डॅनी ब्रिग्जने दमदार कामगिरी करत ६ गडी बाद केले. दुसऱ्या डावात ब्रिग्सने नॉटिंगहॅमशायरचे ४ फलंदाज माघारी पाठवले. वारविक्शायर आणि नॉटिंगहॅमशायरचा यांच्यातील सामना बर्मिंगहॅममध्ये खेळला गेला.