Australia defeated New Zealand by 3 wickets in the 2nd Test : ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा पराभव केला. क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान न्यूझीलंडचा ३ विकेट्सने पराभव केला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिला. ऑस्ट्रेलियाची दुसरी कसोटी जिंकण्यात कर्णधार पॅट कमिन्सने महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीत योगदान देत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

यासह न्यूझीलंडचा संघ ३१ वर्षांचा दुष्काळ संपवू शकला नाही. १९९३ मध्ये मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव केला होता. त्यानंतर ३१ सामन्यांत केवळ १ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यश आले आहे. २०११ मध्ये तो होबार्टमध्ये जिंकला होता. पहिल्या डावात १६२ धावांत गुंडाळल्यानंतर किवी संघाने दुसऱ्या डावात ३७२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २५६धावा केल्या आणि ९४ धावांची आघाडी घेतली होती.

Royal Challengers Bangalore Vs Kolkata Knight Riders Match Highlights in Marathi
KKR vs RCB : रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय, विल जॅक्सची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २७९ धावांचे लक्ष्य होते. पण संघासाठी हे लक्ष्य सोपे नव्हते. कारण पाठलाग करताना कांगारू संघाने ८० धावांवर अर्धा संघ म्हणजे पाच गडी गमावले होते. पण त्यानंतर ॲलेक्स कॅरी, मिचेल मार्श आणि पॅट कमिन्स यांनी आश्चर्यकारक कामगिरी करत संघाला विजयापर्यंत पोहोचवले. कमिन्सने नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. याआधी त्याने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या.

हेही वाचा – फ्रेंच खुली बॅडिमटन स्पर्धा : सात्त्विक-चिरागला विजेतेपद; पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात चायनीज तैपेइच्या ली-यांग जोडीवर मात

खराब सुरुवातीनंतरही ऑस्ट्रेलियाने मिळवला विजय –

न्यूझीलंडच्या २७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती. संघाला पहिला धक्का स्टीव्ह स्मिथच्या (०९) आठव्या षटकात बसला. त्यानंतर नवव्या षटकात तिसऱ्या क्रमांकावर आलेला मार्नस लबूशेन (०६) पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर १२व्या षटकात उस्मान ख्वाजाने आपली विकेट गमावली, तो १ चौकाराच्या मदतीने केवळ ११ धावा करू शकला. यानंतर १५व्या षटकात कॅमेरून ग्रीन (०५) बाद झाला आणि २५व्या षटकात क्रीझवर असलेल्या ट्रॅव्हिस हेडने २ चौकारांच्या मदतीने १८ धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ८० धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

हेही वाचा – WPL 2024 : रिचा घोषची कडवी झुंज अखेर अपयशी, थरारक सामन्यात दिल्लीचा आरसीबीवर १ धावेने विजय

मार्श, कॅरी आणि कमिन्सची शानदार खेळी –

पण इथून ऑस्ट्रेलियाने बाजी पलटवली. मिचेल मार्श आणि ॲलेक्स कॅरी यांनी सहाव्या विकेटसाठी १४० (१७४ चेंडू) धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २२० धावांपर्यंत पोहोचली. १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या मिचेल मार्शच्या विकेटसह ही भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर फलंदाजीला आलेला मिचेल स्टार्क गोल्डन डकचा बळी ठरला.
यानंतर ॲलेक्स कॅरी आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी नाबाद ६१ (६४ चेंडूत)ची नाबाद भागीदारी केली, ज्यामुळे संघाला विजय मिळवता आला. यादरम्यान ॲलेक्स कॅरीने १५ चौकारांच्या मदतीने नाबाद ९८ धावांची खेळी केली. तर पॅट कमिन्सने ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा केल्या.