Mohammad Siraj IND vs WI 1st Test: टीम इंडियाचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज ची २०२५ मध्ये कमाल कामगिरी सुरूच आहे. इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यात २३ बळी घेतल्यानंतर, त्याने आता वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर चांगली सुरूवात केली आहे. सिराजने पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या आहेत. यासह सिराजने मिचेल स्टार्कला मागे टाकत मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे.
वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटीची नाणेफेक जिंकत भारताला गोलंदाजीसाठी पाचारण केले. पण पहिल्याच दिवस विडिंज संघ १६२ धावा करत सर्वबाद झाला. सिराजला बुमराह आणि कुलदीपने चांगली साथ दिल्याने भारताच्या गोलंदाजीसमोर फलंदाजांनी गुडघे टेकले. अहमदाबाद कसोटीत सिराज पाच विकेट घेण्यात अपयशी ठरला, पण चार विकेट्स घेत एका खास यादीत तो नंबर वन गोलंदाज बनला.
मोहम्मद सिराजने कसोटीत घडवला इतिहास
सिराजने मिचेल स्टार्क दबदबा संपवत त्याला मागे टाकत पहिलं स्था पटकावलं आहे. मोहम्मद सिराज आता २०२५च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. २०२५ मध्ये खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद खेळणाऱ्या संघांमध्ये मोहम्मद सिराजने आतापर्यंत ३१ विकेट्स घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात तिसरी विकेट घेत त्याने मिचेल स्टार्कला मागे टाकलं.
मिचेल स्टार्क आता २९ विकेट्ससह या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सिराज २०२५-२७ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये नंबर १ गोलंदाज देखील आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सध्याच्या चक्रात सिराजने आतापर्यंत २७ विकेट्स घेतल्या आहेत.
२०२५ मध्ये सर्वाधिक कसोटी विकेट्स झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुझारबानी ३६ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे आणि सिराज दुसऱ्या स्थानावर आहे. झिम्बाब्वे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नाही, त्यामुळे सिराजने आता या वर्षीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत आपला दबदबा तयार केला आहे. ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन २१९ विकेट्ससह आघाडीवर आहे, जो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सर्व चक्रांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आहे.
मिचेल स्टार्क १९१ विकेट्ससह चौथ्या आणि जसप्रीत बुमराह १७३ विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे. मोहम्मद सिराजने आतापर्यंत WTC मध्ये १२७ विकेट्स घेतल्या आहेत. WTCमधील हा सिराजचा ४२ वा कसोटी सामना आहे.
२०२५ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणाऱ्या संघांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
मोहम्मद सिराज – ३१ विकेट्स – ७ सामने
मिचेल स्टार्क – २९ विकेट्स – ७ सामने
शमार जोसेफ – २४ विकेट्स – ६ सामने
नॅथन लायन – २२ विकेट्स – ३ सामने
जोश टंग – २१ विकेट्स – ४ सामने