Arjun Award, Mohammed Shami: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शमीला मंगळवारी (९ जानेवारी) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अर्जुन पुरस्कार मिळालेला शमी हा ५८वा क्रिकेटपटू आहे. यामध्ये १२ महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तब्बल दोन वर्षांनंतर एका क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. शेवटच्या वेळी शिखर धवनला २०२१ मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. अर्जुन पुरस्कार मिळवणारे सलीम दुर्रानी हे पहिले क्रिकेटपटू आहेत. १९६१ मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला.

अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी म्हणाला की, “अर्जुन पुरस्कार मिळणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे.” तो पुढे म्हणाला की, “काही माणसे यासाठी सर्वस्व पणाला लावतात. लोकांचे आयुष्य निघून जाते पण तरीही काही व्यक्तींना हा पुरस्कार मिळत नाही. तसेच, काहींना आयुष्याच्या शेवटी मी मिळतो. मी नशीबवान आहे की मला हा पुरस्कार मिळाला.”

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आज दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एनएनआयशी बोलताना शमी म्हणाला, “हे माझ्यासाठी स्वप्नवत अशी घटना आहे, यासाठी सर्वप्रथम धन्यवाद! हा पुरस्कार मिळाल्याने मला आनंद होत असून स्वतःचा अभिमान वाटत आहे. अख्खं आयुष्य निघून जातं, लोक पुरस्कार बघत राहतात पण मला ते मिळतंय, यासाठी सर्व भारतीय चाहत्यांचे आभार.”

वर्ल्डकपनंतर मोहम्मद शमी दुखापतीमुळे मैदानात उतरू शकला नाही. विश्वचषकात त्याची कामगिरी उत्कृष्ट होती, तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. शमी पहिले तीन सामने खेळला नाही पण संधी मिळताच त्याने फलंदाजांची पळताभुई थोडी केली. त्याने विश्वचषकातील ७ डावात एकूण २४ विकेट्स घेतल्या. विश्वचषकाच्या अंतिम फेरीदरम्यान शमीला दुखापत झाली होती आणि अद्याप तो पुनरागमन करू शकलेला नाही. याबाबत शमी म्हणाला की, “दुखापत होणे हा खेळाचा एक भाग आहे.”

शमी पुढे म्हणाला, “दुखापत हा खेळाचा एक भाग आहे, पुनरागमन करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मला चाहत्यांकडून मिळालेले प्रेम. संघात लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. हे माझ्यासाठी आणि या संघासाठी अधिक महत्वाचे आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा: IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया टी-२० मालिका जिंकणार का? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

मोहम्मद शमीची कारकीर्द

मोहम्मद शमीने भारताकडून आतापर्यंत ६४ कसोटी सामन्यांमध्ये २२९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १०१ एकदिवसीय सामन्यात १९५ विकेट्स आणि २३ टी-२० सामन्यात २४ विकेट्स घेतल्या आहेत. शमी आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळला आहे. त्याने ११० सामने खेळले आहेत. या काळात शमीने १२७ विकेट्स घेतल्या आहेत.