भारतीय क्रिकेट संघातील तेज गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकाता येथे चौघांनी शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. शमीने त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चौघांनी शिवीगाळ केली. तसेच मारहाणीचाही प्रयत्न केला. इमारतीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली, असा आरोप शमीने तक्रारीत केला आहे. शमीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने शिवीगाळ करणाऱ्यांची ओळख पटवली असून चौघांनाही ताब्यात घेतले आहे. तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

इमारतीच्या परिसरात कार पार्किंग करताना शनिवारी एका व्यक्तीशी वाद झाला. त्यानंतर त्या व्यक्तीने शिवीगाळ केली, असे शमीने सांगितले. कारमधून बाहेर पडलास तर मारहाण करू, अशी धमकीही त्या व्यक्तीने दिल्याचे शमीने सांगितले. या प्रकरणी शमीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणावरून चौघांना ताब्यात घेतले होते. त्यातील तिघांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.