Mohammed Siraj – Zanai Bhosle: देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बहिणींनी आपल्या भावाच्या हाताला राखी बांधली. दरम्यान क्रिकेटपटूंपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींनी रक्षाबंधन साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेताना दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मोहम्मद सिराज हा जनाई भोसलेकडून राखी बांधून घेताना दिसून येत आहे. जनाई भोसले ही लता मंगेशकर यांची नात आहे. हा व्हिडिओ दोघांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिले की, “ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा… याहून सुंदर आणखी काहीच असू शकत नाही.” हा व्हिडिओ आणखी चर्चेत असण्याचं कारण म्हणजे, हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. पण हे नातं बहीण- भावाचं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
इंग्लंडमध्ये सिराज चमकला
मोहम्मद सिराज नुकताच इंग्लंडमधून भारतात परतला आहे. इंग्लंडमध्ये गोलंदाजी करताना त्याने दमदार कामगिरी केली. संपूर्ण मालिकेत गोलंदाजी करताना त्याने २३ गडी बाद केले. यासह सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी होता. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना जिंकून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. या कसोटीत ९ गडी बाद करून त्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटसाठी दोन सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. पण सिराज मालिकेतील पाचही सामने खेळताना दिसून आला. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती, तेव्हा त्याने विकेट्सही काढून दिल्या. त्यामुळे गोलंदाजीत तो भारतीय संघाचा हिरो ठरला.
सिराजने या संपूर्ण मालिकेत १८५ हून अधिक षटकं टाकली. यादरम्यान त्याने १००० हून अधिक चेंडूंचा मारा केला. मुख्य बाब म्हणजे इंग्लंडला शेवटच्या दिवशी विजयासाठी ३५ धावांची गरज असताना त्याने झटपट ४ गडी बाद करून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.