आज भारतासह जगभरात, मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. आपल्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आईविषयी कृतज्ञेची भावना व्यक्त करण्याचा दिवस…सोशल मीडियावरही प्रत्येक जण आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करताना दिसत आहे. मग आजच्या या खास दिवशी आपले क्रीडापटू कसे मागे राहतील, सचिन तेंडुलकरपासून ते सायना नेहवालपर्यंत…सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आजच्या दिवशी आपल्या आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या सगळ्यांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या आईविषयी व्यक्त केलेली भावना, क्रीडाप्रेमींच्या पसंतीस उतरली आहे. “तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही”, अशा शब्दांमध्ये सचिनने आपल्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.