Mukesh Kumar’s Best Bowling Performance : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेला यजमान संघ भारतीय गोलंदाजांसमोर ढेपाळला. या सामन्यात मोहम्मद सिराजने सहा विकेट घेत इतिहास रचला. त्याच्या या शानदार कामगिरीदरम्यान टीम इंडियाच्या आणखी एका गोलंदाजानेही अप्रतिम गोलंदाजी केली. बिहारचा लाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश कुमारने केवळ दोन विकेट घेतल्या. मात्र, दोन विकेट्स घेतल्यानंतरही तो चर्चेत आला. कारण या दरम्यान मुकेशने एकही धाव न देता दोन गडी बाद केले.

मुकेशची सर्वोत्तम कामगिरी ठरली –

मुकेश कुमारने या डावात २.२ षटके टाकली आणि दोन्ही षटके मेडन म्हणून टाकताना एकही धाव दिली नाही. त्याने एकही धाव खर्च न करता दोन विकेट्स घेतल्या. या डावात मुकेशने केशव महाराज आणि कागिसो रबाडा यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मुकेश कुमार पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी सामना खेळत होता. यापूर्वी त्याने वेस्ट इंडिजमध्ये कसोटी पदार्पण केले होते. ही त्याची कारकिर्दीतील दुसरी कसोटी आणि तिसरा डाव होता. त्याने आतापर्यंत ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ० धावांत २ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

मुकेश तिसरा गोलंदाज ठरला –

याआधी कसोटी क्रिकेटमध्ये केवळ दोनच गोलंदाज होते, ज्यांनी एकही धाव न देता दोन किंवा त्याहून अधिक कसोटीत विकेट्स घेतल्या होत्या. म्हणजेच आता मुकेश कुमार हा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. मुकेशच्या आधी १९५९ मध्ये रिची बेनॉडने एकही धाव न देता तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर २०२१ मध्ये जो रूटनेही एकही धाव न देता दोन विकेट्स घेतल्या होत्या.

हेही वाचा – Virat Kohli : केपटाऊनमध्ये ‘राम सिया राम’ गाणे वाजताच विराटने जोडले हात, किंग कोहलीचा VIDEO होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिराजच्या वेगवान माऱ्यापुढे आफ्रिकेचे फलंदाज ढेपाळले –

मुकेश कुमारच्या अगोदर मोहम्मद सिराजने आपल्यासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. मोहम्मद सिराजने १५ धावांत ६ विकेट्स घेत आपली शानदार आकडेवारी नोंदवली. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. तसेच, दक्षिण आफ्रिकेत एका डावात सहा किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा अश्विन, हरभजन आणि शार्दुल यांच्यानंतरचा सिराज हा चौथा गोलंदाज ठरला.