मेलबर्नमध्ये  होणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी युवा फलंदाज जो बर्न्‍सची अनपेक्षितपणे निवड झाली आहे. माझ्या वडिलांचाही यावर अद्याप विश्वास बसत नाही, असे बर्न्‍सने सांगितले.
दुखापतग्रस्त अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शच्या जागी रविवारी २५ वर्षीय जो बर्न्‍सची ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड झाली. याबाबत वडिलांना वाटलेले आश्चर्य आणि स्वत:ला झालेला आनंद यावेळी बर्न्‍सने प्रकट केला. ‘‘माझे क्रिकेटवर अतिशय प्रेम आहे. मी खेळाचा बारकाईने अभ्यास करतो. ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा क्षेत्रातमानाचे स्थान आहे. त्यामुळेच या अनुभवाचा आनंद लुटण्यासाठी मी उत्सुक आहे. प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्या मार्गदर्शनाखाली मला खेळण्याची संधी मिळणार आहे, हे माझ्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे,’’ असे बर्न्‍सने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My father did not believe yet says joe burns
First published on: 23-12-2014 at 12:46 IST