Gautam Gambhir says My fight with Virat is only on the field : आयपीएलमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर एकदा नाही तर दोनदा मैदानावर वाद घालताना दिसले आहेत. गेल्या हंगामात म्हणजेच आयपीएल २०२३ मध्ये दोघांमध्ये दुसऱ्यांदा वाद झाला होता. मैदानावर कोहली आणि गंभीर यांच्यात फक्त ३६ चा आकडा दिसला आहे, मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही गौतम गंभीरचे कौतुक कराल. व्हिडीओमध्ये गंभीर विराट आणि त्याची ‘लढाई फक्त मैदानावर आहे’ असे म्हणताना ऐकू येते.

वास्तविक, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गंभीर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अँकर गंभीरला विचारताना दिसत आहे की, “विराटने कोणत्या गोलंदाजाविरुद्ध धाव घेत वनडेमध्ये ५० वे शतक झळकावले?” या प्रश्नाचे उत्तर देताना गंभीर म्हणतो, “लॉकी फर्ग्युसन.” गंभीर पुढे म्हणतो, ” आता तुम्ही हे पुन्हा-पुन्हा दाखवा की, मला सर्व काही लक्षात राहते. माझी लढाई फक्त मैदानावर आहे.”

Rani Mukerji reacts on feud with sister Kajol
“मतभेद सर्वत्र होतात, पण…”, काजोलबरोबरच्या वादावर स्पष्टच बोलली राणी मुखर्जी; दोघींचं नातं काय? जाणून घ्या
Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
Who are the top five bowlers who have dismissed batsmen most times on duck in IPL history
IPL 2024 : लसिथ मलिंगासह ‘या’ पाच गोलंदाजांनी आयपीएल इतिहासात सर्वाधिक फलंदाजांना केलय शून्यावर बाद
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
Surya is Back: अशक्य वाटणारा फटका ‘मसल मेमरी’मुळे खेळतो! सूर्यकुमार यादवनं सांगितलं यशाचं कारण

आयपीएल २०२३मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात कोहली आणि नवीन उल हक एकमेकांना भिडले होते. या सामन्यात गंभीरने कोहलीशी आक्रमकपणे वाद घातला होता. काही दिवसापूर्वी एएनआयने या वादाबाबतचा प्रश्न गौतम गंभीरला विचारला होता, तेव्हा तो म्हणाला, “सामना सुरू असताना मैदानात काय होते, त्याच्यात पडण्याचा माझा अधिकार नाही. पण सामना संपल्यानंतरही जर कुणी माझ्या खेळाडूंबाबत बोलत असेल त्यांच्याशी वाद घालत असेल तर मला त्या वादात पडून माझ्या खेळाडूंना संरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

हेही वाचा – IND vs SA : ‘संजूला संघात संधी मिळेल का…’, सॅमसनच्या शतकानंतर गौतमने निवडकर्त्यांवर उपस्थित केला ‘गंभीर’ प्रश्न

कोहलीने वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ५० वे वनडे शतक झळकावले –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये, भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळला, ज्यामध्ये कोहलीने शतक झळकावले, जे त्याच्या वनडे कारकिर्दीतील ५०वे शतक होते. विराट कोहलीने ११३ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११७ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IND vs SA Test : विराट कोहलीला मालिकेत कसं बाद करायचं? दक्षिण आफ्रिकेला एबी डिव्हिलियर्सने सांगितला गुरुमंत्र

विराट कोहलीची आतापर्यंत ८० आंतरराष्ट्रीय शतके आहेत –

विराट कोहलीने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत १११ कसोटी, २९२ वनडे आणि ११५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्‍याने कसोटीमध्‍ये २९ शतके, एकदिवसीयमध्‍ये ५० आणि आंतरराष्ट्रीय टी-२०मध्‍ये एक शतक झळकावले आहे. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा शतके झळकावणारा फलंदाज आहे.