AB de Villiers on how to dismiss Virat Kohli : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० आणि वनडे मालिका पार पडली. आता या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू पुनरागमन करतील, ज्यामध्ये विराट कोहलीही सामील आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीला कसे बाद करायचे, हे आपल्या संघाला सांगितले आहे.

या दौऱ्यात विराट कोहली मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये सहभागी झाला नसला, तरी कसोची सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे भारताला आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून इतिहास रचण्याची संधी असेल. या कामात त्यांच्यासाठी विराटची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, ज्याचा दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी रेकॉर्ड खूप चांगला आहे.

Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: “अरे २ ओव्हरमध्ये २४ धावा सहज होतील…” शशांक आणि आशुतोषने सांगितला किस्सा, शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं बोलणं, पाहा व्हीडिओ
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर विराटचा कसोटी रेकॉर्ड खूप चांगला –

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या ७ कसोटी मन्यात ५१.३६च्या सराससरीने ७१९ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून २ शतके आणि ३ अर्धशतके झाली आहेत. त्याचा उत्कृष्ट विक्रम लक्षात घेता त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगली कामगिरी अपेक्षित आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीला कसे बाद करायचे हे आपल्या संघाला सांगितले आहे.

हेही वाचा – IND vs AFG : टीम इंडियाला मोठा धक्का! अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतून सूर्यकुमार यादव बाहेर?

विराट कोहलीला कसे बाद करायचे?

पीटीआयशी बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला की, जर गोलंदाजांनी चौथ्या यष्टीच्या अनुषंगाने सातत्यपूर्ण गोलंदाजी केली, तरच कोहलीच्या बॅटची कडा चेंडूला लागू शकते.तसेच खेळपट्टीवरून काही हालचाल होण्याची आशा करावी लागेल, जेणेकरुन विराचला फलंदाजी करताना अडचणी निर्माण होतील. डिव्हिलियर्स म्हणाला की, “विराट कोहलीसारख्या फलंदाजाला बाद करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चौथ्या स्टंप चॅनलवर गोलंदाजी करणे आणि प्रतीक्षेचा खेळ खेळणे. त्याचबरोबर अशा एका चेंडूची प्रतीक्षा करा, जो थोडा दूर जाईल. कारण तुम्ही चांगल्या खेळाडूवर थेट आक्रमण करू शकत नाही.”

एबी डिव्हिलियर्सने दिले सचिन तेंडुलकरचे उदाहरण –

डिव्हिलियर्सने पुढे सचिन तेंडुलकरचे उदाहरण देत म्हणाला, “तेंडुलकरच्या प्रकरणाप्रमाणे, जसे नेहमी एलबीडब्ल्यू (आत येणारा चेंडू) ची वाट पाहणे मूर्खपणाचे होते. कारण तो तुम्हाला मिड-विकेटमधून शॉट मारेल. त्यामुळे ते चेंडू विराटला ऑफ-स्टंपच्या बाहेर टाका आणि एकतर बाहेर जाण्याची किंवा आत येण्याची वाट पहा.”

हेही वाचा – IND vs SA : ‘संजूला संघात संधी मिळेल का…’, सॅमसनच्या शतकानंतर गौतमने निवडकर्त्यांवर उपस्थित केला ‘गंभीर’ प्रश्न

भारताचा कसोटी संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएस भरत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप, . जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा.