न्या. मुकुल मुद्गल समितीच्या अहवालामध्ये ‘क्लीन चिट’ मिळाल्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे माझ्याकडे पुन्हा सोपविण्यात यावी, अशी विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज हा संघ आयपीएलमधील श्रीनिवासन यांच्या मालकीच्या इंडिया सिमेंट या कंपनीचा आहे. नियमांनुसार आयपीएल संघमालकाने जर स्पर्धेला धोका पोहोचवण्याचे किंवा दर्जा कमी करण्याचे किंवा स्पर्धेच्या प्रतिमेला तडा देण्याचे कोणतेही कृत्य केले, तर त्यांचा संघ स्पर्धेतून बाद ठरवला जाऊ शकतो. याबाबत श्रीनिवासन यांनी सांगितले की, माझ्यावर केलेले आरोप हे अर्थहीन असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2014 रोजी प्रकाशित
बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी श्रीनिवासन सर्वोच्च न्यायालयात
न्या. मुकुल मुद्गल समितीच्या अहवालामध्ये ‘क्लीन चिट’ मिळाल्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे माझ्याकडे पुन्हा सोपविण्यात यावी
First published on: 22-11-2014 at 05:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: N srinivasan to supreme court reinstate me as bcci president