रॅफेल नदाल व मारिया शारापोवा या अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी बीएनपी पॅरिबस टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद मिळविले.  पहिला सेट गमावल्यानंतर बहारदार खेळ करीत नदाल याने जुआन मार्टिन डेल-पोत्रो याच्यावर ४-६, ६-३, ६-४ अशी मात केली. सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केल्यानंतर नदालचे हे तिसरे विजेतेपद आहे. शारापोवा हिने अंतिम लढतीत कॅरोलिन वोझ्नियाकी हिचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला. हार्डकोर्टवर तिने यापूर्वी २०१० मध्ये टोकियो स्पर्धा जिंकली होती. त्यानंतरच्या हार्डकोर्टवरील स्पर्धेत तिचे हे पहिलेच विजेतेपद आहे.