MI-W vs UPW-W, WPL 2023 Eliminator Match Score Live updates : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात एलिमिनेटरचा रंगतदार सामना सुरु आहे. यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबईच्या सलामीवीर फलंदाज यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूजने आक्रमक सुरुवात केली. पण अंजली सरवानीच्या गोलंदाजीवर २१ धावांवर असताना यास्तिका झेलबाद झाली. त्यानंतर हेली मॅथ्यूजने मुंबईसाठी सावध खेळी केली. मात्र, मॅथ्यूजही २६ धावांवर असताना पार्शवी चोप्राच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर मुंबईची कमान सांभाळण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानात उतरली.

परंतु, या सामन्यातही कौरला आक्रमक खेळी करून मोठी धावसंख्या साकारता आली नाही. सोफी एक्लस्टोनच्या फिरकीवर कौर १४ धावांवर असताना त्रिफळाचीत झाली. सौफीने कौरची दांडी गुल केल्याचा व्हिडीओ ट्वीटरवर तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान, सिवर ब्रंटने आणि केरने धडाकेबाज फलंदाजी करून यूपीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. सिवरने ३८ चेंडूत ७२ धावा कुटल्या. तर केरने १९ चेंडूत २९ धावा केल्या. या धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने २० षटकांत ४ विकेट्स गमावत १८२ धावांपर्यंत मजल मारली. यूपीला विजयासाठी १८३ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्समध्ये पॉवर प्ले मध्ये रंगतदार सामना सुरु असतानाच दिप्ती शर्माच्या गोलंदाजीवर सामन्याला वेगळं वळण लागलं. कारण मुंबईची सलामीवीर फलंदाज हेली मॅथ्यूजने मोठा फटका मारून हवेत चेंडू मारला होता. त्याचदरम्यान अंजली सरवानीने जबरदस्त झेल घेतला. पण रिप्लाय पाहिल्यानंतर अंजलीचे बोट जमिनीला टेकलेले दिसले आणि मॅथ्यूजला जीवदान मिळाला.