कोणत्याही कारणाविना राष्ट्रीय कुस्ती शिबिरात दाखल न झालेल्या चार फोगट भगिनींपैकी गीता, रितू आणि संगीता यांना शिबिरात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने जाहीर केला आहे. मात्र, अद्यापही शिबिरात न येण्याचे कारण न दिलेल्या बबिता फोगटला प्रवेश देण्यात आलेला नसून तिच्याबाबतची संदिग्धता कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काहीही कारणमीमांसा न देता शिबिरास न आलेल्या फोगट भगिनी आणि अन्य ११ कुस्तीपटूंना शिबिरात दाखल करून घेणार नसल्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यात बदल करून पुन्हा तीन भगिनींना लखनौला सुरू शिबिरात समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यामुळे जकार्ता आशियाई स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरीत या तिघी फोगट भगिनी खेळू शकणार आहेत; परंतु बबिताचा त्यात अंतर्भाव केलेला नसल्याचेही महासंघाने नमूद केले आहे. महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांनी बबिताने अद्यापही कोणतेही कारण दिले नसल्याने तिला आम्ही शिबिरात सहभागी होऊ देणार नसल्याबाबत ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे तिला जकार्ता आशियाई स्पर्धेच्या पात्रता सामन्यांमध्ये किंवा स्पर्धेतही सहभागी होता येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National wrestling camp phogat sisters
First published on: 25-05-2018 at 03:14 IST