Premium

IPL 2023 : ‘स्वीट मँगो’ स्टोरीबद्दल नवीन उल हकचा मोठा खुलासा, सांगितले विराट कोहलीशी काय होता संबंध?

Naveen Reveals Sweet Mango Story : नवीन उल हक आयपीएल २०२३ दरम्यान त्याच्या ‘स्वीट मॅंगो’ इन्स्टा स्टोरीमुळे चर्चेत आला होता, जी त्याने विराट कोहलीच्या विकेटनंतर शेअर केली होती. आता त्याबाबत खुलासा केला आहे.

Naveen ul Haq reveals about sweet mangoes instagram story
नवीन उल हक आणि मँगो स्टोरी (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Naveen ul Haq reveals about sweet mangoes instagram story : आयपीएल २०२३ मध्ये विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील मैदानावरील वाद अनेक दिवस चर्चेत राहील होता. १ मे २०२३ रोजी एलएसजी आणि आरसीबी यांच्यात झालेल्या सामन्यात नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते. या सामन्यानंतर काही दिवसांनी नवीनने सोशल मीडियावर ‘स्वीट मँगोची’ एक स्टोरी शेअर केली होती, जी लोकांनी विराट कोहलीशी जोडली होती. याबाबत आता स्वत: नवीन उल हकने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन उल हकने ही स्टोरी विराटसोबतच्या वादानंतर काही दिवसांनी पोस्ट केली होती, जेव्हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला गेला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला आरसीबीचा विराट कोहली पहिल्याच षटकातच बाद झाला होता, त्यानंतर नवीनने इनस्टाग्रामवर ‘स्वीट मँगो’ची स्टोरी शेअर केली होती.

आता नवीनने या स्टोरीबद्दल खुलासा करताना सांगितले की, “मी धवलभाईला (एलएसजी टीम लॉजिस्टिक) सांगितले की मला आंबे खायचे आहेत. त्याच रात्री त्यांना आंबे मिळाले. आम्ही गोव्याला गेल्यावर ते आंबा घेऊन आले होते. त्यामुळे मी टीव्हीच्या स्क्रीनसमोर बसून आंबा खात होतो. त्यावेळी स्क्रीनवर इतर कोणत्याही खेळाडूचा (कोहलीचा) फोटो किंवा काहीही नव्हते, स्क्रीनवर मुंबई इंडियन्सचा खेळाडू होता. मी फक्त ‘स्वीट मँगो’ लिहिले होते आणि लोकांनी त्याचा अर्थ काहीतरी वेगळा काढला. त्यामुळे मी पण काही बोललो नाही, मी फक्त टाकले आणि जाऊ दिले. मला वाटले आंब्याचा हंगाम आहे, त्यामुळे दुकानदारांचीही चांगली कमाई व्हावी.”

हेही वाचा – VIDEO : सचिन-विराट नव्हे तर, ‘हा’ खेळाडू आहे भारताचा सर्वोत्तम फलंदाज, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने सांगितले नाव

आयपीएल २०२४साठी मिनी लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. एलएसजीने जयदेव उनाडकट, मनन वोहरा, स्वप्नील सिंग, डॅनियल सॅम्स, करण शर्मा, अर्पित गुलेरिया, सूर्यांश शेडगे आणि करुण नायर या आठ खेळाडूंना करारमुक्त केले आहे. लखनऊ सुपर जायंट्सने नवीनला आगामी हंगामासाठी संघात कायम ठेवले आहे. तसेच आणखी वेगवान गोलंदाज अष्टपैलू खरेदी करण्यावर लक्ष असू शकते.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Naveen ul haq reveals about sweet mangoes instagram story viral from ipl 2023 vbm

First published on: 02-12-2023 at 16:03 IST
Next Story
VIDEO : सचिन-विराट नव्हे तर, ‘हा’ खेळाडू आहे भारताचा सर्वोत्तम फलंदाज, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने सांगितले नाव