दिल्लीचे माजी कमिशनर नीरज कुमार यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नीरज कुमार लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा विभागाचे अध्यक्ष देण्यात येणार आहे. नीरज कुमार यांच्याकडे वर्षभरासाठी अध्यक्षपद सुपूर्त करण्यात आले आहे. आयपीएलच्या गव्‍‌र्हनिंग कौन्सिलच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.‘‘ लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा विभागाच्या अध्यक्षपदी नीरज कुमार यांची निवड करण्यात आली आहे,’’ अशी माहिती बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली.
नीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली पोलीसांनी आयपीएल स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना अटक केली होती. यापूर्वी रवी सावंत यांच्याकडे हे पद होते, पण त्यांचा कालावधी संपल्याने त्या जागी नीरज कुमार यांची निवड करण्यात आली आहे.