नेदरलँडच्या फुटबॉल लीग स्पर्धेदरम्यान डच इरेडिवाइस मैदानात एक दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीविहानी झाली नाही. नेक निजमेजेनला पराभूत केल्यानंतर फुटबॉल क्लब विटस्सी अरन्हेमचे चाहते स्टँडवर उभे राहून जल्लोष करत होते. त्यावेळी स्टँड खाली कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

विटस्सी अरन्हेम संघाने नेक निजमेजेनला १-० ने पराभूत केलं. सामना संपल्याची घोषणा होताच चाहते स्टँडमध्ये उभे राहिले. त्यांच्यासोबत मैदानातील खेळाडूही जल्लोष करत होतो. अचानक चाहत्यांच्या वजनाने स्टँड कोसळला. इतकी दुर्घटना होऊनही तुटलेल्या स्टँडवरही चाहते नाचताना दिसले. या दुर्घटनेनंतर निजमेजेनच्या महापौरांनी दु:ख व्यक्त केलं आहे. “या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. पण जे काही झालं ते चांगलं नव्हतं. यासाठी एका चौकशी समितीची गठीत केली आहे. कारण स्टँड कोसळण्याच्या घटनेसाठी कोण जबाबदार होतं? याचं कारण समजू शकेल”, असं त्यांनी सांगितलं आहे.

रविवारी झालेल्या सामन्यात विजय मिळवल्यांतर विटस्सी संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. गुरुवारी विटस्सीचा सामना टोट्टेन्हेम संघासोबत आहे.