VIDEO : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा बॉल टॅम्परिंग; ICCनं सुनावणी कठोर शिक्षा!

चेंडूशी छेडछाड केल्याची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Netherlands Vivian Kingma gets four-match suspension for ball-tampering
नेदरलँड्सचा वेगवान गोलंदाज व्हिव्हियन किंग्माला बॉल टॅम्परिंगसाठी शिक्षा

दोहा येथे अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स (AFG vs NED) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. अफगाणिस्तानने सर्व सामन्यांमध्ये विजय नोंदवत ही मालिका सहज जिंकली. पण गेल्या सामन्यात नेदरलँड्सचा वेगवान गोलंदाज व्हिव्हियन किंग्मा याने सामन्यादरम्यान चेंडूशी छेडछाड (ball tampering) केली. तिसर्‍या सामन्याच्या ३१व्या षटकात व्हिव्हियन किंग्माने चेंडूशी छेडछाड केली आणि चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याला आयसीसीने चार सामन्यांची शिक्षा सुनावली.

आयसीसीने म्हटले, ”व्हिव्हियन किंग्माने खेळाडू आणि खेळाडूंच्या वैयक्तिक समर्थनासाठी आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद २.१४चे उल्लंघन केल्याचे आढळले. चार सामन्यांच्या बंदीसोबतच, किंग्माच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये पाच डिमेरिट गुण देखील जोडले गेले आहेत. २४ महिन्यांच्या कालावधीतील ही त्याची पहिली चूक होती.”

हेही वाचा – IPL 2022 : विराट पुन्हा कॅप्टन होणार? RCB प्रमुखांनी दिली ‘लक्ष्यवेधी’ प्रतिक्रिया; म्हणाले

नेदरलँड्सच्या गोलंदाजाची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानंतर पंचांनी चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी नेदरलँड्सला धावांचा दंड ठोठावला. यामुळे अफगाणिस्तानला ५ धावा मिळाल्या. व्हिव्हियन किंग्माने आपला गुन्हा मान्य केला आहे. किंग्माने एकदिवसीय मालिकेतील तीन सामन्यांमध्ये दोन बळी घेतले आणि २६ षटकात ११८ धावा दिल्या. अंतिम एकदिवसीय सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीत ५० धावांत १ बळी घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Netherlands vivian kingma gets four match suspension for ball tampering adn

Next Story
IPL 2022 : विराट पुन्हा कॅप्टन होणार? RCB प्रमुखांनी दिली ‘लक्ष्यवेधी’ प्रतिक्रिया; म्हणाले…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी