scorecardresearch

Premium

IND vs WI T20: निकोलस पूरनने हार्दिक पांड्याच्या आव्हानाला दिले चोख प्रत्युत्तर, पण अर्शदीप सिंगने दिला घाव

Nicholas Pooran and Hardik Pandya: तिसरा टी-२० सामना जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने निकोलस पूरनला आव्हान दिले. निकोलस पूरनने पाचव्या टी-२० सामन्यात हार्दिकच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर निकोलस पुरनने शेअर केलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nicholas Pooran and Hardik Pandya's verbal spat
हार्दिक पांड्या आणि निकोलस पूरन (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

Nicholas Pooran injured by Arshdeep’s ball: टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा टी-२० मालिकेतील पराभवाने संपुष्टात आला आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला टी-२० मालिकेत यजमानांचा पराभव करता आला नाही. रविवारी झालेल्या निर्णायक पाचव्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-२ अशा फरकाने आपल्या नावी केली. आता निकोलस पूरनने शेअर केलेल्या फोटोची आणि हार्दिक पांड्याच्या चॅलेंजबद्दल बरीच चर्चा होत आहे.

अर्शदीप सिंगने निकोलस पुरनला दिला घाव –

निकोलस पूरनने हार्दिकच्या षटकात २ षटकार मारले असतील, पण अर्शदीप सिंगनेही पूरनला खोल घाव देण्याची काम केले. वास्तविक, अर्शदीप सिंगचा एक चेंडू पूरणच्या पोटावर लागला. हा चेंडू इतका वेगवान होता की पूरणच्या पोटावर जखम झाली. सामना संपल्यानंतर पुरणने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये पोटावर आणि हातावर जखमा झाल्याचे दिसत होते. यापैकी एक जखम ब्रँडन किंगच्या शॉटमुळे पूरनच्या हाताला झाली.

१०४ वर्षाच्या आजीने केलं स्काय डायव्हिंगच
‘वय हा फक्त आकाडाच!” १०४ वर्षाच्या आजीने केलं स्काय डायव्हिंग; जागतिक विक्रम मोडण्याचा केला प्रयत्न
Video of fan saying I love you' to Mahi Bhai
MS Dhoni: ‘माही भाई आय लव्ह यू’, चाहत्याच्या या हाकेला महेंद्रसिंग धोनी काय दिले उत्तर? पाहा VIDEO
A stunning comeback Shreyas Iyer's amazing catch by Shaun Abbott and the umpire gives not out Watch the video
IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video
IND vs AUS: How serious is Akshar Patel's injury Team India in search of all-rounders after the match R. Ashwin Special Video Viral
IND vs AUS: अक्षर पटेलची दुखापत किती गंभीर? टीम इंडिया अष्टपैलूच्या शोधात, सामन्यानंतर अश्विनचा स्पेशल Video व्हायरल

हार्दिक आणि पूरण यांच्यात शाब्दिक युद्ध –

टी-२० मालिकेत भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या आणि वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन यांच्यात वेगळीच लढत पाहायला मिळाली. वास्तविक, हे शाब्दिक युद्ध हार्दिक पांड्याने सुरू केले होते आणि ते निर्णायक सामन्यात निकोलस पूरनने संपवले. वास्तविक, तिसर्‍या टी-२० सामन्यातील विजयानंतर हार्दिकने पूरणला आव्हान दिले होते. पूरनने गेल्या सामन्यात हार्दिकच्या त्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – Kohli and Azam: विराट आणि बाबर पहिल्यांदा कधी भेटले आणि काय झाले होते बोलणे? किंग कोहलीने केला खुलासा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते, परंतु टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत वेस्ट इंडिजचा ७ विकेटने पराभव केला. या सामन्यानंतर हार्दिक म्हणाला होता की, निक्की (निकोलस पूरन) फलंदाजीला उशीरा आल्याने, आमच्या गोलंदाजांसाठी गोलंदाजी करणे सोपे झाले होते. त्याचबरोबर अक्षर पटेलची ४ षटके आधी टाकून घेतली. जर पूरणला अ‍ॅटॅकिंग खेळायचे असेल, तर त्याने माझ्याविरुद्ध खेळावे, अशा स्पर्धेचा मी आनंद घेतो.

चौथ्या टी-२०मध्ये पूरण ठरला होता अपयशी –

पूरणने चौथ्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या या आव्हानाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण तो झेलबाद झाला. त्याने कुलदीपविरुद्ध हवेत शॉट मारला, पण लाँग ऑनवर सूर्यकुमार यादवने त्याचा झेल घेतला. त्यामुळे पूरणने पाचव्या सामन्यात हार्दिकच्या आव्हानाला उत्तर दिले. त्याने हार्दिक पांड्याच्या एका षटकात २ षटकार मारले. तसेच सामन्यात ४७ धावांची खेळी करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा – Tabrez Shamsi: बाबर आझमच्या टिकाकारांना तबरेझ शम्सीचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, “पन्नासची सरासरी असणे हा…”

हार्दिक पांड्याच्या षटकात पूरनने मारले दोन षटकार –

शेवटच्या टी-२० सामन्यात निकोलस पूरन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. पूरण क्रीझवर येत असल्याचे पाहून हार्दिकने अक्षर पटेलला गोलंदाजी न देता स्वतः तिसरे षटक टाकले. हार्दिकच्या या षटकात मुकेश कुमारने मिडऑफला निकोलस पूरनचा झेल सोडला. यानंतर पूरनने ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूंवर २ षटकार ठोकले. यासह पूरणने पांड्याच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर दिले.


Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nicholas pooran shared a photo of arshdeep singhs injury after being hit by a ball vbm

First published on: 14-08-2023 at 14:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×