scorecardresearch

World Boxing Championship: निखत झरीन सलग दुसऱ्यांदा ठरली वर्ल्ड चॅम्पियन, भारताला मिळाले तिसरे सुवर्णपदक

World Boxing Championship: निखत झरीन सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. तिने ४८-५० किलो वजनी गटात व्हिएतनामी बॉक्सरचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. त्याआधी शनिवारी भारताने दोन सुवर्णपदके जिंकली होती.

Nikhat Zareen won India's third gold medal
निखत जरीन (फोटो-ट्विटर)

World Boxing Championship 2023: महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. निखत झरीनने ४८-५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. निखतने अंतिम फेरीत व्हिएतनामच्या गुयेन थी तामचा पराभव केला. जागतिक स्पर्धेत तिचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. निखतच्या आधी नीतू गंगस (४५-४८ किलो) आणि स्वीटी बोरा (७५-८१ किलो) यांनी शनिवारी वजन गटात सुवर्णपदक जिंकले होते. निखत जरीनचे हे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दुसरे सुवर्णपदक आहे. तिने गेल्या वर्षी ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.

पहिल्या फेरीत निखतचे पूर्ण वर्चस्व होते. तिने विरोधी बॉक्सरला एकही संधी दिली नाही. पहिल्या फेरीतच तिने ५-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या व्हिएतनामच्या बॉक्सरने दमदार पुनरागमन केले. पण, निखतने संधी मिळताच विरोधी बॉक्सरवरही ठोशांचा पाऊस पाडला. मात्र, दुसरी फेरी व्हिएतनामच्या बॉक्सरने ३-२ अशी जिंकली.

तिसरी फेरीही चुरशीची झाली. निखत आणि व्हिएतनामच्या बॉक्सरने आपली पूर्ण ताकद दाखवली. प्रशिक्षकाने दिलेल्या मार्गाचा अवलंब करत निखतने विरोधी बॉक्सरपासून अंतर राखले आणि उत्कृष्ट अप्परकट आणि जॅब्स लावले. यानंतर रेफ्रींनी सामना थांबवून व्हिएतनामी बॉक्सरची स्थिती जाणून घेतली. इथूनच निखतचा विजय जवळपास निश्चित झाला होता आणि अखेरीस निखतने ही लढत ५-० अशी जिंकली आणि सलग दुसऱ्यांदा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे सुवर्णपदक जिंकले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 20:52 IST

संबंधित बातम्या