ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या भारतीय संघावर आशियाई क्रीडा स्पध्रेसाठीही निवड समितीने विश्वास व्यक्त केला आहे. इन्चॉन, दक्षिण कोरियाला होणाऱ्या स्पध्रेसाठी १६ सदस्यीय संघ कायम राखण्यात आला आहे. सरदार सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची हॉकी इंडियाकडून घोषणा करण्यात आली.
भारतीय संघ
गोलरक्षक : प्री. आर. श्रीजेश (उपकर्णधार). बचावपटू : गुरबाज सिंग, बिरेंद्र लकरा, रुपिंदर पाल सिंग, कोठाजित सिंग, व्ही. आर. रघुनाथ. मध्यरक्षक : धरमवीर सिंग, सरदार सिंग (कर्णधार), डॅनिश मुज्ताबा, चिंग्लेनसाना सिंग कंगुजॅम, मनप्रीत सिंग. आघाडीपटू : रमणदीप सिंग, आकाशदीप सिंग, एस. व्ही. सुनील, गुरविंदर सिंग चंडी, निक्कीन थिमय्या.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2014 रोजी प्रकाशित
भारतीय हॉकी संघात बदल नाही
ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या भारतीय संघावर आशियाई क्रीडा स्पध्रेसाठीही निवड समितीने विश्वास व्यक्त केला आहे.
First published on: 05-09-2014 at 01:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No change in indian hockey team