विराट खेळत असताना प्रत्येक विक्रम धोक्यात – गावसकर

विराटचा फिटनेस दाद देण्यासारखा – गावसकर

विंडीजविरुद्ध वन-डे मालिकेत विराट कोहली

सचिन तेंडुलकरचे विक्रम विराट कोहली मोडणार का अशी चर्चा तुम्ही आतापर्यंत अनेकदा ऐकली असेल. या चर्चांमध्ये अनेकांनी आतापर्यंत आपापली मत व्यक्त केली आहेत. मात्र विराट कोहली सध्या ज्या प्रकारे खेळतो आहे, ते पाहता तो असेपर्यंत प्रत्येक विक्रम धोक्यात असेलं असं मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. नुकत्याच विंडीजविरुद्ध वन-डे मालिकेत विराटने सचिनचा सर्वात जलद १० हजार धावांचा विक्रम आपल्या नावे जमा केला.

अवश्य वाचा – धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला चांगली संधी – रोहित शर्मा

“जोपर्यंत विराट कोहली क्रिकेट खेळतोय, तोपर्यंत प्रत्येक विक्रम धोक्यात असेल. सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतकं असे सर्व विक्रम विराट मोडू शकतो कारण त्याचा फिटनेस चांगला आहे. खेळाडू जर शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तर पुढची ७-१० वर्ष तो सहज खेळू शकतो. सचिननेही वयाची ३५ वर्ष ओलांडल्यानंतर क्रिकेट खेळणं सुरुच ठेवलं होतं. जर कोहलीही इतकी वर्ष खेळू शकला तर कसोटी आणि वन-डे क्रिकेटमधले सर्व विक्रम त्याच्या नावावर होतील.” गावसकर ‘आज तक’ या वाहिनीशी बोलत होते.

रविवारपासून भारत विंडीजविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेत विराटला विश्रांती देऊन रोहितच्या हातात कर्णधारपद देण्यात आलेलं आहे. या मालिकेत भारताला विराटची उणीव नक्कीच भासेल, मात्र ज्या पद्धतीने भारतीय संघाने आशिया चषकात धडाकेबाज कामगिरी केली, त्याचप्रमाणे या मालिकेतही भारताला अशीच कामगिरी करावी लागणार आहे. विंडीजचा टी-२० संघ हा वन-डे व कसोटी संघापेक्षा अधिक बलवान असेल, त्यामुळे भारताला कोणतीही गोष्ट गृहीत धरुन चालणार नाही. गावसकरांनी आपलं मत व्यक्त केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No record safe the way virat kohli is batting says sunil gavaskar

ताज्या बातम्या