भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची बातमी चुकीची असल्याचं स्पष्टीकरण निवड समितीचे प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांनी दिलं आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर करताना, ते पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर धोनीसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोला २०१६ टी-२० विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याचा संदर्भ होता. मात्र या फोटोमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली. मात्र धोनीच्या निवृत्तीबद्दल कोणतीही माहिती आमच्याकडे आली नसल्याचं सांगत ही बातमी खोटी असल्याचं प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे.

अवश्य वाचा – धोनीची निवृत्ती की आणखी काही?? विराटच्या एका ट्विटने रंगली नेटीझन्समध्ये चर्चा

दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवड समितीने भारतीय संघाची घोषणा करताना लोकेश राहुलला डच्चू देत शुभमन गिलला भारतीय संघात स्थान दिलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No update on ms dhonis retirement the news is incorrect says chief selector msk prasad psd
First published on: 12-09-2019 at 17:21 IST