मेलबर्न : गतवर्षी डिसेंबर महिन्यात करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतरही विलगीकरण करण्याऐवजी एका वृत्तपत्राला मुलाखत देण्यासाठी घराबाहेर पडणे महागात पडले, असा खुलासा सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने बुधवारी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोकोव्हिच सध्या मेलबर्नमध्ये सराव करत असून १७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील त्याच्या समावेशाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. ‘‘कठीण कालखंडात तुम्ही सर्वानी पाठिंबा दिल्यामुळे मी आभारी आहे. परंतु डिसेंबरमधील माझ्या कृत्यांविषयी चुकीचे वृत्त सगळीकडे पसरत आहे. १४ डिसेंबरला एका बास्केटबॉल सामन्यासाठी मी हजेरी लावली. तेथून आल्यावर १६ तारखेला मी जलद प्रतिजन चाचणी केली. त्याचा निकाल नकारात्मक आला,’’ असे जोकोव्हिचने निवेदनात नमूद केले. ‘‘त्याच दिवशी मी आरटी-पीसीआर चाचणीही केली. १७ तारखेला रात्री त्या चाचणीचा सकारात्मक निकाल आला. परंतु एका प्रतिष्ठित वृत्तपत्राला शब्द दिल्यामुळे त्या कामानिमित्त १८ डिसेंबरला घराबाहेर पडलो. तेव्हा वेळीच विलगीकरण केले असते, तर माझ्या ऑस्ट्रेलियातील प्रवेशावर इतका वाद उद्भवला नसता,’’ असेही जोकोव्हिचने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not isolating after covid 19 infection was error says novak djokovic zws
First published on: 13-01-2022 at 01:11 IST