New Zealand vs Bangladesh 3rd ODI: बांगलादेश क्रिकेट संघाने एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा त्यांच्याच भूमीवर ९ गडी राखून पराभव करत इतिहास रचला. या दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने न्यूझीलंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर वन डे सामन्यात पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने १६व्या षटकात सामना जिंकला.

मॅक्लीन पार्क, नेपियर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा संघ बांगलादेशी गोलंदाजांनी ३१.४ षटकांत ९८ धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून सलामीवीर विल यंगने २६ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. यंग व्यतिरिक्त इतर तीन फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला. बांगलादेशी गोलंदाजांसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पूर्णपणे शरणागती पत्करली होती, असे दिसत होते. बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम, तनझिम हसन शाकिब आणि सौम्या सरकार यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. यांच्या व्यतिरिक्त मुस्तफिझूरने आपल्या खात्यात एक विकेट जमा केली.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
CSK vs LSG सामन्यानंतर IPL कडून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई, ऋतुराज-राहुलला १२ लाखांचा दंड
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

९९ धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने १५.१ षटकात केवळ १ गडी गमावून सामना जिंकला. बांगलादेशसाठी सलामीला आलेल्या सौम्या सरकार आणि अनामूल हक यांनी पहिल्या विकेटसाठी १५* धावांची भागीदारी केली त्यावेळी सौम्या सरकार रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या नझमुल हुसेन शांतोने अनामूल हकसह दुसऱ्या विकेटसाठी ६९ (५० चेंडू) धावांची भागीदारी केली, जी १३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अनामूलच्या विकेटने मोडली. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लिटन दासने १* आणि नझमुल हुसेन शांतो ५१* धावांवर नाबाद राहिले आणि संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा: IPL 2024 Auction: चेन्नईचा बोली पाहून प्रीती झिंटाने झाली आश्चर्यचकित, कॅमेरात रिअ‍ॅक्शन कैद; पाहा Video

न्यूझीलंडने मालिका जिंकली

तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत न्यूझीलंडने २-१ने विजय मिळवला. यजमान न्यूझीलंडने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली होती, त्यानंतर तिसरा सामना गमावला. मात्र, तिसऱ्या सामन्यातील विजय बांगलादेशसाठी ऐतिहासिक ठरला. पहिल्या वन डेत न्यूझीलंडने डीएलएस पद्धतीने ४४ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात किवी संघाने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला.

हेही वाचा: IPL 2024 Auction: “सीएसकेच्या प्रत्येक बोलीमागे धोनीचे…”, चेन्नईच्या सीईओ यांनी केला मोठा खुलासा

या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लिटन दासने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

तत्पूर्वी, सरकारच्या १५१ चेंडूत १६९ धावांच्या खेळीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. लिटन दास (१७४ धावा) नंतर तो या फॉरमॅटमध्ये बांगलादेशसाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. डावाची सुरुवात करणाऱ्या या फलंदाजाने २२ चौकार आणि दोन षटकार ठोकले. यादरम्यान, त्याने सचिन तेंडुलकरचा १५ वर्षांचा जुना विक्रम मोडला आणि न्यूझीलंडमधील एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठी खेळी खेळणारा आशियाई फलंदाज बनला. यापूर्वी सचिनने २००९ मध्ये नाबाद १६३ धावा केल्या होत्या.