जपानची राजधानी असलेल्या टोकियोला २०२० सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या(आयओसी)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अर्जेंटिनाची राजधानी ब्रुनोस आयर्समध्ये २०२० सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठीचे मतदानपर बैठकीत अंतिम टप्प्यात टोकियोचा विजय झाला. त्यानुसार ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याचा मान टोकियोला मिळाला आहे.
मतदानात टोकियोच्या विरोधात तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुल स्पर्धेत होती. टोकियोला एकूण ६० मते मिळाली, तर इस्तंबुलला ३६ मते मिळाली. स्पेनच्या माद्रिद शहरावर तर पहिल्याच टप्प्यात मतदानाच्या बाहेर पडण्याची नामुष्की आली. ऑलिम्पिकस्पर्धेबरोबर २०२०मध्ये होणाऱया पॅरालम्पिक स्पर्धाही टोकियोमध्येच होणार आहे.